पाकचा दुबळ्या नेपाळवर सहज विजय
वृत्तसंस्था/ डंबुला
आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने दुबळ्या नेपाळचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला. अर्धशतक झळकाविणाऱ्या गुल फिरोजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजी दिली. नेपाळने 20 षटकात 6 बाद 108 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 11.5 षटकात 1 बाद 110 धावा जमवित हा सामना 49 चेंडू बाकी ठेऊन 9 गड्यांनी जिंकला.
नेपाळच्या डावामध्ये कविता जोशीने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 31, सीताराणा मगरने 30 चेंडूत 3 चौकारांसह 26, पूजा महातोने 32 चेंडूत 3 चौकारांसह 25 आणि कविता कुवरने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. नेपाळच्या डावामध्ये केवळ 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. चोरट्या धावा घेण्याच्या नादात नेपाळचे 3 फलंदाज धावचीत झाले. पाकतर्फे सादिया इकबालने 19 धावांत 2 तर फातिमा सनाने 24 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुल फिरोजा आणि मुनिबा अली यांनी सलामीच्या गड्यासाठी 11.2 षटकात 105 धावांची शतकी भागिदारी केली. फिरोजाने 35 चेंडूत 10 चौकारांसह 57 धावा झोडपल्या. मुनिबा अलीने 34 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 46 धावा केल्या. तुबा हसन एका धावेवर नाबाद राहिली. पाकच्या डावामध्ये 18 चौकार नोंदविले गेले. नेपाळतर्फे कविता जोशीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : नेपाळ 20 षटकात 6 बाद 108 (कविता जोशी नाबाद 31, पूजा महातो 25, कविता कुवर 13, सीताराणा मगर 26, सादिया इकबाल 2-19, फातिमा सना 1-24), पाक 11.5 षटकात 1 बाद 110 (गुल फिरोजा 57, मुनिबा अली नाबाद 46, तुबा हसन नाबाद 1, अवांतर 6, जोशी 1-15).
Home महत्वाची बातमी पाकचा दुबळ्या नेपाळवर सहज विजय
पाकचा दुबळ्या नेपाळवर सहज विजय
वृत्तसंस्था/ डंबुला आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने दुबळ्या नेपाळचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला. अर्धशतक झळकाविणाऱ्या गुल फिरोजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजी दिली. नेपाळने 20 षटकात 6 बाद 108 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 11.5 […]