फरिदाबादमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले,तीव्रता3.2 इतकी

हरियाणामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 6 वाजता फरिदाबादला 3.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. सध्या तरी कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. अलिकडेच हरियाणातील रोहतक आणि झज्जर जिल्ह्यातही भूकंपाचे …

फरिदाबादमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले,तीव्रता3.2 इतकी

हरियाणामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 6 वाजता फरिदाबादला 3.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. सध्या तरी कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. अलिकडेच हरियाणातील रोहतक आणि झज्जर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.

ALSO READ: वैष्णो देवीच्या ट्रॅकला भूस्खलन, चार जखमी

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र जमिनीखाली पाच किलोमीटर खोलीवर होते. या सौम्य तीव्रतेच्या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तरीही, पहाटेच्या या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली.

ALSO READ: उत्तराखंडच्या या भागात जाणवले भूकंपाचे धक्के

अचानक झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी अनेक कुटुंबांना सावध केले. फरीदाबादच्या अनेक भागात लोक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी पळाले. तथापि, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही मोठे नुकसान झाले नाही ही दिलासादायक बाब आहे.

ALSO READ: गुजरातचे मुख्यमंत्री कार्यालय आणि सचिवालयाला बॉम्बची धमकी

बुधवारी रात्री 12:46 वाजता रोहतक जिल्ह्यात 3.3 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याची खोली जमिनीखाली 10 किमी होती. भूकंपानंतर राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल माहिती दिली

Edited By – Priya Dixit

 

Go to Source