‘दामदुप्पट कमवा…आहे तेही घालवा’
सायबर गुन्हेगारांचा युवकाला साडेतेरा लाखांचा गंडा
बेळगाव : ‘गुगल मॅप रिव्ह्यू करा आणि घरबसल्या दामदुप्पट कमवा’ अशी जाहिरातबाजी करत सायबर गुन्हेगारांनी कुवेंपूनगर येथील एका युवकाला 13 लाख 45 हजार रुपयांना लुटले आहे. यासंबंधी शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल झाला आहे. कुवेंपूनगर येथील आदर्श सोमशेखरय्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीईएन पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी कंपनीत काम करणाऱ्या आदर्श यांनी सायबर गुन्हेगारांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तब्बल 13 लाख 45 हजार रुपये गमावले आहेत.आदर्श यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. ‘गुगल मॅप रिव्ह्यू केलात तर 250 ते एक हजार रुपयांपर्यंत देण्यात येतील’, असा तो मेसेज होता.
माया मल्होत्रा या नावाने मेसेज पाठवून त्यासाठी लिंकही पाठविण्यात आली होती. 3 जून रोजी सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून आदर्श यांनी टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून गुगल रिव्ह्यूला सुरुवात केली. 150 रुपये गुंतवून तीन टास्क व 2 हजार रुपये गुंतवून आणखी एक टास्क पूर्ण केल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आदर्शच्या खात्यात 2 हजार 800 रुपये जमा केले. त्यानंतर 7 हजारच्या गुंतवणुकीला 9 हजार 800 रुपये जमा करण्यात आले. त्याचदिवशी 28 हजार रुपयांचे एक टास्कही त्यांनी पूर्ण केले. ‘बँक खाते गोठवण्यात आले आहे, तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवायचा आहे’ असे सांगत तब्बल 13 लाख 45 हजार रुपये भरून घेतले आहेत.
Home महत्वाची बातमी ‘दामदुप्पट कमवा…आहे तेही घालवा’
‘दामदुप्पट कमवा…आहे तेही घालवा’
सायबर गुन्हेगारांचा युवकाला साडेतेरा लाखांचा गंडा बेळगाव : ‘गुगल मॅप रिव्ह्यू करा आणि घरबसल्या दामदुप्पट कमवा’ अशी जाहिरातबाजी करत सायबर गुन्हेगारांनी कुवेंपूनगर येथील एका युवकाला 13 लाख 45 हजार रुपयांना लुटले आहे. यासंबंधी शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल झाला आहे. कुवेंपूनगर येथील आदर्श सोमशेखरय्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीईएन पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी कंपनीत काम करणाऱ्या आदर्श यांनी सायबर गुन्हेगारांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तब्बल 13 लाख 45 हजार रुपये गमावले आहेत.आदर्श यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. ‘गुगल मॅप रिव्ह्यू केलात तर 250 ते एक हजार रुपयांपर्यंत […]