अर्जेंटिना संघामध्ये डायबालाला डच्चू

वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस पुढील महिन्यात होणाऱ्या कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ पुन्हा जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्नशील राहिल. या स्पर्धेपूर्वी अर्जेंटिना फुटबॉल संघासाठी दोन सरावाचे सामने आयोजित केले आहेत. या सामन्यांसाठी अर्जेंटिना संघात मेस्सीचा समावेश झाला असून पावलो डायबालाला डच्चू देण्यात आला आहे. अर्जेंटिनाचे हे सरावाचे सामने इक्वेडोर आणि ग्वाटेमाला बरोबर होणार आहेत. या […]

अर्जेंटिना संघामध्ये डायबालाला डच्चू

वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस
पुढील महिन्यात होणाऱ्या कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ पुन्हा जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्नशील राहिल. या स्पर्धेपूर्वी अर्जेंटिना फुटबॉल संघासाठी दोन सरावाचे सामने आयोजित केले आहेत. या सामन्यांसाठी अर्जेंटिना संघात मेस्सीचा समावेश झाला असून पावलो डायबालाला डच्चू देण्यात आला आहे.
अर्जेंटिनाचे हे सरावाचे सामने इक्वेडोर आणि ग्वाटेमाला बरोबर होणार आहेत. या सरावाच्या सामन्यांसाठी अर्जेंटियाच्या फुटबॉल फेडरेशनने 29 सदस्यांचा फुटबॉल संघ जाहीर केला आहे. 2022 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या अर्जेंटिना संघामध्ये पावलो डायबालाचा समावेश होता. पण या आगामी सरावाच्या सामन्याकरीता त्याला संघातून वगळण्यात आले आहे. अर्जेंटिना आणि इक्वेडोर यांच्यातील सरावाचा सामना शिकागो येथे 9 जूनला तर अर्जेंटिना आणि गुटमेला यांच्यातील सामना 14 जून रोजी मेरीलँड येथे खेळविला जाईल. कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धा 20 जूनपासून सुरु होणार असून अर्जेंटिनाचा अ गटात समावेश आहे. अ गटामध्ये कॅनडा, चिली व पेरु यांचाही सहभाग आहे. या स्पर्धेतील अर्जेंटिनाचा पहिला सामना 20 जून रोजी कॅनडा बरोबर अॅटलांटा येथे होणार आहे.