गोंधळी गल्लीत दत्त जयंती उद्यापासून

प्रतिनिधी/ बेळगाव गोंधळी गल्ली येथील सार्वजनिक श्री दत्त जयंतीनिमित्त सोमवार दि. 25 रोजी सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक होणार आहे. याशिवाय लहान मुला-मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा होणार आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता अभिषेक होणार असून सायंकाळी 5.58 वाजता जन्मोत्सव होणार आहे. याप्रसंगी यमुनाक्का महिला भजनी मंडळातर्फे पाळणा गीते सादर केली जाणार आहेत. रात्री 8 वाजता महाआरती […]

गोंधळी गल्लीत दत्त जयंती उद्यापासून

प्रतिनिधी/ बेळगाव
गोंधळी गल्ली येथील सार्वजनिक श्री दत्त जयंतीनिमित्त सोमवार दि. 25 रोजी सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक होणार आहे. याशिवाय लहान मुला-मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा होणार आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता अभिषेक होणार असून सायंकाळी 5.58 वाजता जन्मोत्सव होणार आहे. याप्रसंगी यमुनाक्का महिला भजनी मंडळातर्फे पाळणा गीते सादर केली जाणार आहेत. रात्री 8 वाजता महाआरती व त्यानंतर 9.30 वाजता संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे.
बुधवार दि. 27 रोजी सकाळी 8 वाजता अभिषेक, सायंकाळी 5 वाजता झंकार महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 7 वाजता मंत्रपुष्पांजली होणार आहे. गल्लीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.