लोकसभेच्या चिंतन बैठकीसाठी दुष्यंत कुमार गौतम गोव्यात

मडगाव : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे गोव्यात पोहोचले आहेत तर काल गुऊवारी राज्यसभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम गोव्यात पोहोचले आहेत. दुष्यंत कुमार गौतम यांनी गुऊवारीच लोकसभेच्या तयारीसाठी चिंतन बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघावर […]

लोकसभेच्या चिंतन बैठकीसाठी दुष्यंत कुमार गौतम गोव्यात

मडगाव : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे गोव्यात पोहोचले आहेत तर काल गुऊवारी राज्यसभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम गोव्यात पोहोचले आहेत. दुष्यंत कुमार गौतम यांनी गुऊवारीच लोकसभेच्या तयारीसाठी चिंतन बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रीय करण्यावर भर दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपच्या हातून गेला होता. तो पुन्हा मिळविण्यासाठी पक्षाने जोरदार मोहीम उघडली आहे. केंद्रीय कौशल्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर दक्षिण गोवा मतदारसंघाची अधिक जबाबदारी देण्यात आलेली आहे. ते पक्षाचे प्रमुख कार्यकमर्ते, आमदार व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत.