केकेआर संघात दुष्मंथा चमीरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या 2024 च्या आयपीएल हंगामात सहभागी होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या खेळाडूंच्या यादीची घोषणा केली. केकेआर संघातील इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अॅटकिनसन उपलब्ध राहणार नसल्याने त्याच्या जागी लंकेच्या दुष्मंथा चमीराचा समावेश करण्यात आला आहे.
केकेआरने चमीराला 50 लाख रुपयांच्या करारावर खरेदी केले आहे. आयपीएल स्पर्धेच्या 2018 आणि 2021 साली चमीराने अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीचे प्रतिनिधित्व केले होते. 2022 च्या आयपीएल हंगामात त्याने लखनौ सुपर जायंट्स संघाकडून आपली हजेरी लावली होती. 2022 च्या आयपीएल हंगामात त्याने 12 सामन्यातून 9 बळी मिळविले होते.
2024 च्या महिलांच्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेसाठी गुजरात जायंट्स आणि आरसीबी संघांनी आपल्या बदली खेळाडूंची घोषणा केली आहे. नवोदीत महिला क्रिकेटपटू काशवी गौतम ही सर्वात अनुभवी महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जाते. मात्र दुखापतीमुळे तिने महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुजरात जायंट्सने काशवी गौतमला 2 कोटी रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले आहे. भारतीय महिला अष्टपैलू क्रिकेटपटू कनिका अहुजा दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होणार नाही. आता तिच्या जागी सायली सठगरेला करारबद्ध केले आहे.
Home महत्वाची बातमी केकेआर संघात दुष्मंथा चमीरा
केकेआर संघात दुष्मंथा चमीरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या 2024 च्या आयपीएल हंगामात सहभागी होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या खेळाडूंच्या यादीची घोषणा केली. केकेआर संघातील इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अॅटकिनसन उपलब्ध राहणार नसल्याने त्याच्या जागी लंकेच्या दुष्मंथा चमीराचा समावेश करण्यात आला आहे. केकेआरने चमीराला 50 लाख रुपयांच्या करारावर खरेदी केले आहे. आयपीएल स्पर्धेच्या 2018 आणि 2021 साली […]