रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणामुळे रेल्वेंच्या वेळापत्रकात व्यापक बदल

बेळगाव : सांगली ते मिरज दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने 25 डिसेंबर ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत काही एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात तर काहींच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. निजामुद्दिन-म्हैसूर सुवर्णजयंती एक्स्प्रेस, बेंगळूर-जोधपूर, चंदीगढ-यशवंतपूर, निजामुद्दिन-यशवंतपूर, म्हैसूर-उदयपूर, यशवंतपूर-निजामुद्दिन, गरीब नवाज एक्स्प्रेस, चंदीगढ-यशवंतपूर, यशवंतपूर-चंदीगढ, पुणे-एर्नाकुलम यासह इतर एक्स्प्रेस उशिराने धावणार आहेत. बेंगळूर-मिरज राणी […]

रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणामुळे रेल्वेंच्या वेळापत्रकात व्यापक बदल

बेळगाव : सांगली ते मिरज दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने 25 डिसेंबर ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत काही एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात तर काहींच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. निजामुद्दिन-म्हैसूर सुवर्णजयंती एक्स्प्रेस, बेंगळूर-जोधपूर, चंदीगढ-यशवंतपूर, निजामुद्दिन-यशवंतपूर, म्हैसूर-उदयपूर, यशवंतपूर-निजामुद्दिन, गरीब नवाज एक्स्प्रेस, चंदीगढ-यशवंतपूर, यशवंतपूर-चंदीगढ, पुणे-एर्नाकुलम यासह इतर एक्स्प्रेस उशिराने धावणार आहेत. बेंगळूर-मिरज राणी चन्नम्मा एक्स्प्रेस 25, 26, 27, 29, 30 डिसेंबर तर 2, 3, 4, 5, 9, 11 जानेवारी दरम्यान बेळगावपर्यंत धावणार आहे. मिरज-बेंगळूर चन्नम्मा एक्स्प्रेस 26, 27, 28, 30, 31 डिसेंबर तर 3, 4, 5, 6, 10, 12 जानेवारी दरम्यान बेळगावपासून धावणार आहे. लोंढा-मिरज अनारक्षित एक्स्प्रेस 26, 27, 28, 30, 31 डिसेंबर तर 3, 4, 5, 6, 10, 11 जानेवारी दरम्यान शेडबाळपर्यंत धावेल. मिरज-कॅसलरॉक अनारक्षित एक्स्प्रेस 26, 27, 28, 30, 31 डिसेंबर तर 3, 4, 5, 6, 10, 11 जानेवारी दरम्यान शेडबाळ येथून धावणार आहे. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस मंगळवार दि. 26, 27 व 31 डिसेंबर रोजी उशिरा धावणार आहे. तर तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस 26 व 30 डिसेंबर रोजी 2 ते 3 तास उशिरा धावणार आहे. प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकानुसार रेल्वेप्रवास करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेने केले आहे.