हनुमध्वज उतरविल्यामुळे एम. के. हुबळीमध्ये तणाव

बेळगाव : मंड्या जिल्ह्यातील केरगोडू येथील हनुमध्वज हटविल्यानंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटलेले असतानाच कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथेही ध्वजाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एम. के. हुबळी येथील हनुमान मंदिराजवळ गावकऱ्यांनी भगवा ध्वज फडकावला होता. पंधरा दिवसांपूर्वी ध्वजस्तंभावर फडकावलेला भगवा पोलिसांनी हटविल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. […]

हनुमध्वज उतरविल्यामुळे एम. के. हुबळीमध्ये तणाव

बेळगाव : मंड्या जिल्ह्यातील केरगोडू येथील हनुमध्वज हटविल्यानंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटलेले असतानाच कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथेही ध्वजाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एम. के. हुबळी येथील हनुमान मंदिराजवळ गावकऱ्यांनी भगवा ध्वज फडकावला होता. पंधरा दिवसांपूर्वी ध्वजस्तंभावर फडकावलेला भगवा पोलिसांनी हटविल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्याच ध्वजस्तंभावर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी हिंदू संघटनांनी रविवारी तयारी केली होती. सोशल मीडियावर चलो एम. के. हुबळीची हाक देण्यात आली होती. यासंबंधीची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, बैलहेंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक व त्यांचे सहकारी रविवारी सकाळी एम. के. हुबळीमध्ये दाखल झाले. ध्वज फडकाविण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना ग्राम पंचायतीत बोलावून त्यांची बैठक घेण्यात आली. तणावाच्या पार्श्वभूमीवर गावात बंदोबस्त वाढविण्यात आला असून ध्वजाचा गुंता अद्याप सुटला नाही.