पावसामुळे बस्तवाड येथे घराची भिंत कोसळून नुकसान
वार्ताहर/किणये
बेळगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बस्तवाड गावातील चन्नाप्पा मल्लाप्पा मरगाण्णाचे व मनोहर कृष्णा बेळगावकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे. ही भिंत बुधवारी सकाळी 11.45 च्या दरम्यान कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस्तवाड गावातील संभाजी गल्लीतील चन्नाप्पा मरगाण्णाचे व मनोहर यांचे घर आहे. मुसळधार पावसामुळे यांच्या घराची भिंत कोसळली. यावेळी घरातील सर्व सदस्य घराबाहेर होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. भिंत कोसळल्यामुळे जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना राहायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Home महत्वाची बातमी पावसामुळे बस्तवाड येथे घराची भिंत कोसळून नुकसान
पावसामुळे बस्तवाड येथे घराची भिंत कोसळून नुकसान
वार्ताहर/किणये बेळगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बस्तवाड गावातील चन्नाप्पा मल्लाप्पा मरगाण्णाचे व मनोहर कृष्णा बेळगावकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे. ही भिंत बुधवारी सकाळी 11.45 च्या दरम्यान कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस्तवाड गावातील संभाजी गल्लीतील चन्नाप्पा मरगाण्णाचे व मनोहर यांचे घर आहे. मुसळधार पावसामुळे यांच्या घराची […]
