आयटीसी वेलकममुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे प्रतिपादन
बेळगाव : जोल्ले उद्योग समूहाचे ‘आयटीसी वेलकम’ हॉटेलचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. काकती येथे निसर्गरम्य ठिकाणी सर्व सुविधांयुक्त असे उत्तम दर्जाचे हे हॉटेल झाले आहे. शुक्रवारी जोल्ले उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, संचालिका आमदार शशिकला जोल्ले व जोल्ले हॉस्पिटॅलिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते हॉटेलचे थाटात उद्घाटन झाले. वेलकम हॉटेलचे जनरल मॅनेजर राहुल कानगो यांनी स्वागत केले. आयटीसी वेलकममुळे बेळगाव पर्यटन क्षेत्राला नवीन उभारी मिळणार आहे. बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन होत असते. या दरम्यान मान्यवरांची राहण्या, जेवण्याची उत्तम सोय आयटीसी वेलकममध्ये केली आहे. आयटीसीचे हे देशातील 25 वे हॉटेल आल्याचे सांगितले.
सर्व श्रेय एमडी बसवप्रभू जोल्लेंना
जोल्ले उद्योग समूहाचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी एकसंबा येथील सैनिक स्कूलच्या माध्यमातून जोल्ले उद्योग समूहाचा प्रवास सुरू झाल्याचे सांगितले. सध्या जोल्ले हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून आयटीसी वेलकम हॉटेल सुरू आहे. यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. याचे सर्व श्रेय एमडी बसवप्रभू जोल्लेंना जाते. आमदार शशिकला जोल्ले यांनी बेळगाव जिल्ह्यात हॉटेल व्यवसाय किती महत्त्वाचा आहे, यासंदर्भात माहिती देत आयटीसी वेलकम हॉटेलच्या शुभारंभप्रसंगी शुभेच्छा दिल्या. बसवप्रसाद जोल्ले यांनी आयटीसी वेलकम हॉटेलमधील सुविधा, हॉटेल सुरू करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी आयटीसी वेलकममुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
आयटीसी वेलकममुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे प्रतिपादन बेळगाव : जोल्ले उद्योग समूहाचे ‘आयटीसी वेलकम’ हॉटेलचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. काकती येथे निसर्गरम्य ठिकाणी सर्व सुविधांयुक्त असे उत्तम दर्जाचे हे हॉटेल झाले आहे. शुक्रवारी जोल्ले उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, संचालिका आमदार शशिकला जोल्ले व जोल्ले हॉस्पिटॅलिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते हॉटेलचे थाटात उद्घाटन झाले. वेलकम […]