शिवोलीत 16लाखाचे ड्रग्ज जप्त

केरळातील संशयिताला अटक पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) शिवोली येथे केलेल्या कारवाईत 16 लाख 44 हजार 100 ऊपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात केरळीयन संशयिताला अटक केली आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव मूसिन थिडाईल […]

शिवोलीत 16लाखाचे ड्रग्ज जप्त

केरळातील संशयिताला अटक
पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) शिवोली येथे केलेल्या कारवाईत 16 लाख 44 हजार 100 ऊपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात केरळीयन संशयिताला अटक केली आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव मूसिन थिडाईल (30 वर्षे) असे असून तो मूळ कुन्नूर केरळ येथील आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो शिवोली येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. ही कारवाई रविवारी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात एएनसीने एका रशियन नागरिकाला एक कोटींहून अधिक किंमतीच्या ड्रग्जसह अटक केली होती. नंतर त्याची कसून चौकशी केली असता या केरळीयन संशयिताचा सुगावा लागला होता.
रविवारी संशयित शिवोली येथील फुटबॉल मैदानाजवळ ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ठेवला. संशयित येताच त्याला शिताफीने रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 144.10 ग्रॅम एस्कटसी पावडर व  40 ब्लॉट पेपर हे एलएसडी पेपर जप्त करण्यात आले. एएनसी निरीक्षक सजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील फाळकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. एएनसी अधीक्षक   बोसुएट सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. एएनसीने सध्या सुरू असलेला पर्यटन हंगाम आणि आगामी काळात होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अमलीपदार्थांवर कठोर कारवाई करण्यास सुऊवात केली आहे. डिसेंबर महिना अर्धा झाला नाही तोच मोरजी आणि शिवोली अशा दोन ठिकाणी कारवाई करून सुमारे 1 कोटी 17 लाख 19 हजार 100 ऊपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Go to Source