जलपर्णीच्या विळख्यात हरवले नाले
बेळगाव : बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याचे ड्रोनद्वारे छायाचित्रे व व्हिडिओ गुरुवारी काढण्यात आले. बेळगाव शेतकरी संघटनेने ही छायाचित्रे घेतली असून दोन्ही नाले जलपर्णी आणि गाळाने बुजून गेले आहेत. त्यामुळे आता तरी प्रशासन या नाल्यांच्या खोदाईसाठी पाऊल उचलणार आहे का? हे पाहावे लागणार आहे. बळ्ळारी नाला किंवा लेंडी नाल्यामुळे दरवर्षीच या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या दोन्ही नाल्यांची खोदाई करावी, तसेच या नाल्यांतील पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप घालणे, तसेच जलपर्णी काढण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे खाते याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी दरवर्षी हजारो एकरमधील भातपीक कुजून जात आहे. गुरुवारी ड्रोनद्वारे मुचंडीपासून येळ्ळूर रस्त्यापर्यंत छायाचित्रे व व्हिडिओ काढण्यात आले आहेत. बळ्ळारी नाल्याबरोबरच लेंडी नाल्याचेही व्हिडिओ काढण्यात आले असून आता ही संपूर्ण माहिती कृषीमंत्र्यांकडे दिली जाणार आहे, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी जलपर्णीच्या विळख्यात हरवले नाले
जलपर्णीच्या विळख्यात हरवले नाले
बेळगाव : बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याचे ड्रोनद्वारे छायाचित्रे व व्हिडिओ गुरुवारी काढण्यात आले. बेळगाव शेतकरी संघटनेने ही छायाचित्रे घेतली असून दोन्ही नाले जलपर्णी आणि गाळाने बुजून गेले आहेत. त्यामुळे आता तरी प्रशासन या नाल्यांच्या खोदाईसाठी पाऊल उचलणार आहे का? हे पाहावे लागणार आहे. बळ्ळारी नाला किंवा लेंडी नाल्यामुळे दरवर्षीच या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत […]