उबेर चषकासाठी ड्रॉ जाहीर
वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)
येथे 27 एप्रिल ते 5 मे दरम्यान होणाऱ्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थॉमस आणि उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवारी काढण्यात आला. या ड्रॉ नुसार भारताचा पुरुष संघ आणि इंडोनेशियाचा संघ एकाच गटात असून भारताचा आणि यजमान चीनचा महिला संघ एका गटात आहेत.
या स्पर्धेत पुरुष विभागात भारत हा विद्यमान विजेता आहे. गेल्या वर्षी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेत विजेतेपद मिळवून नवा इतिहास घडविला होता. गेल्या वर्षी इंडोनेशियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. इंडोनेशियाने आतापर्यंत ही स्पर्धा विक्रमी 14 वेळा जिंकली आहे. शुक्रवारी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये भारत आणि इंडोनेशिया हे एकाच गटात असून थायलंड आणि इंग्लंड यांचाही यामध्ये समावेश आहे. 2022 साली भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस चषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले होते. बँकॉकमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता.
महिलांच्या उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या ड्रॉमध्ये भारताचा अ गटात समावेश असून या गटात यजमान चीन, कॅनडा, सिंगापूर यांचा सहभाग आहे. चीनच्या महिला संघाने आतापर्यंत उबेर चषक 15 वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत 1957, 2014 आणि 2016 साली उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
Home महत्वाची बातमी उबेर चषकासाठी ड्रॉ जाहीर
उबेर चषकासाठी ड्रॉ जाहीर
वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन) येथे 27 एप्रिल ते 5 मे दरम्यान होणाऱ्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थॉमस आणि उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवारी काढण्यात आला. या ड्रॉ नुसार भारताचा पुरुष संघ आणि इंडोनेशियाचा संघ एकाच गटात असून भारताचा आणि यजमान चीनचा महिला संघ एका गटात आहेत. या स्पर्धेत पुरुष विभागात भारत हा विद्यमान विजेता आहे. […]