राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावात

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संतनगरी शेगाव (जिल्हा बुलढाणा) येथे दौऱ्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींचे सकाळी १० वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने शेगावात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी सर्वात आधी श्री संत …

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावात

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संतनगरी शेगाव (जिल्हा बुलढाणा) येथे दौऱ्यावर आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींचे सकाळी १० वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने शेगावात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी सर्वात आधी श्री संत गजानन महाराज मंदिराला भेट देऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच शेगाव येथील ‘आनंद विसावा’ परिसरात आयोजित राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

 

माहिती समोर आली आहे की, हा मेळावा केंद्रीय आयुष मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आला असून, आयुर्वेदासह पारंपारिक चिकित्सा पद्धतींचा प्रसार करणे आणि शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या शेतीबाबत प्रोत्साहन देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहे.

 

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगाव शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुमारे ३००० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहे.तसेच राष्ट्रपतींच्या भेटीमुळे आज सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत भाविकांसाठी श्रींचे दर्शन स्थगित ठेवण्यात आले होते. दुपारी १२:३० नंतर दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.

ALSO READ: मुंबई पोलिसांनी वर्सोवा येथे २५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली

शेगावचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राष्ट्रपती संध्याकाळी नागपूरला रवाना होतील. तिथे त्या ब्रह्माकुमारींच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचे सुवर्ण युग’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ करतील.

ALSO READ: डोंबिवली : नर्ससोबत प्रेमसंबंध तर पत्नीशी वाद; डॉक्टरने बिअरसोबत झोपेच्या ४५ गोळ्या घेतल्या
Edited By- Dhanashri Naik

Go to Source