जेसीबीच्या साहाय्याने कचरा-सांडपाण्याचा निचरा

कंग्राळी बुद्रुकमधील ग्रामस्थांतून समाधान वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक बेळगाव महानगरपालिकेचे सांडपाणी व प्लास्टिक कचरा कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीमध्ये टाकण्यात आल्याने गटारी तुडूंब भरुन सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. नगरसेवक श्रेयस नाकाडी यांच्या नजरेस सदर बाब येताच ताबडतोब जेसीबीच्या सहाय्याने गटारीतील कचरा साफ करून गटारी स्वच्छ करून सांडपाण्याचा निचरा केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शाहूनगरमार्गे […]

जेसीबीच्या साहाय्याने कचरा-सांडपाण्याचा निचरा

कंग्राळी बुद्रुकमधील ग्रामस्थांतून समाधान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
बेळगाव महानगरपालिकेचे सांडपाणी व प्लास्टिक कचरा कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीमध्ये टाकण्यात आल्याने गटारी तुडूंब भरुन सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. नगरसेवक श्रेयस नाकाडी यांच्या नजरेस सदर बाब येताच ताबडतोब जेसीबीच्या सहाय्याने गटारीतील कचरा साफ करून गटारी स्वच्छ करून सांडपाण्याचा निचरा केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शाहूनगरमार्गे येणारे महानगरपालिकेचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीतील गटारीतून गेल्या 25 वर्षांपासून येत आहे. महापालिका हद्दीतील नागरिक केरकचऱ्याबरोबर प्लास्टिक व बाटल्यासुद्धा गटारीत टाकत असल्यामुळे सांडपाण्याबरोबर प्लास्टिक बाटल्यांचा खच पडल्यामुळे कंग्राळी बुद्रुक हद्दीतील गटारी तुडूंब भरुन सांडपाणी पुढे न जाता शिवारांमध्ये पसरले होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली. रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. परंतु कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, तानाजी पाटील यांनी नगरसेवक श्रेयस नाकाडी यांच्या नजरेस सदर बाब दाखवून दिल्याबरोबर त्यांनी लगेच जेसीबी मशीन बोलावून तुंबलेली गटार स्वच्छ करून सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली. यामुळे सांडपाणी वाहण्यास गटारी मोकळ्या झाल्या. यामुळे नगरसेवक श्रेयस नाकाडी यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद अष्टेकर, अनंद चिखलकर, सुभाष पाटील, सुनिल पावशे आदी उपस्थित होते.