डॉ. सोमनाथ यांचे आज गोकाकमध्ये आगमन
वार्ताहर /गोकाक
चांद्रयान 3 मोहिमेचे प्रमुख व इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांचे शुक्रवार दि. 1 मार्च रोजी गोकाक येथे आगमन होत आहे. येथील शून्य संपादन मठाच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गणनीय कार्य केलेल्या महनीय व्यक्तीस एक लाख रुपये रोख कायकश्री प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा कायकश्री प्रशस्तीसाठी भारतीय अवकाश तंत्रज्ञान (इस्रो) ची निवड केली असून यानुसार इस्रोच्यावतीने प्रशस्ती स्वीकारण्यासाठी डॉ. सोमनाथ गोकाकला येत आहेत. यंदा येथील चन्नबसवेश्वर विद्यापीठ आवारात आयोजित 19 वे शरण संस्कृती उत्सवानिमित्त 1 मार्च ते 4 मार्च दरम्यान बसवधर्म संमेलन, पत्रकार संमेलन, महिला संमेलन व युवा संमेलन आयोजित करण्यात आले असून दि. 1 रोजी आयोजित बसवधर्म संमेलनात डॉ. सोमनाथ सहभागी होत असून या शिवाय सकाळी जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्रतिनिधी विद्यार्थी समवेत परिसंवाद, उद्योग मेळावा व पुस्तक मेळाव्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे. सायंकाळी बसव धर्म संमेलनात शून्य संपादक मठाच्यावतीने पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार व सन्मान डॉ. सोमनाथ हे स्वीकारणार असून सत्कार स्वीकारून उपस्थित जनतेला मार्गदर्शन करणार असल्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष संतोष सोनवलकर यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी डॉ. सोमनाथ यांचे आज गोकाकमध्ये आगमन
डॉ. सोमनाथ यांचे आज गोकाकमध्ये आगमन
वार्ताहर /गोकाक चांद्रयान 3 मोहिमेचे प्रमुख व इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांचे शुक्रवार दि. 1 मार्च रोजी गोकाक येथे आगमन होत आहे. येथील शून्य संपादन मठाच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गणनीय कार्य केलेल्या महनीय व्यक्तीस एक लाख रुपये रोख कायकश्री प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा कायकश्री प्रशस्तीसाठी भारतीय अवकाश तंत्रज्ञान (इस्रो) ची निवड […]