डॉ.सोनाली सरनोबत यांच्याकडून ‘त्या’ महिलेची विचारपूस

बेळगाव : खानापूर तालुक्यातील आमगाव येथील महिलेला वाहतूक सुविधेअभावी उपचारासाठी तिरडीवरून आणण्याच्या घटनेने खानापूर तालुक्यात आजही वैद्यकीय व पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट होते, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. ग्रामस्थांनी धडपड करून सदर महिलेला तिरडीवरून आणून 108 रुग्णवाहिकेमध्ये ठेवले. त्यानंतर तिला उपचारासाठी केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी डॉ. सरनोबत यांनी त्या […]

डॉ.सोनाली सरनोबत यांच्याकडून ‘त्या’ महिलेची विचारपूस

बेळगाव : खानापूर तालुक्यातील आमगाव येथील महिलेला वाहतूक सुविधेअभावी उपचारासाठी तिरडीवरून आणण्याच्या घटनेने खानापूर तालुक्यात आजही वैद्यकीय व पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट होते, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. ग्रामस्थांनी धडपड करून सदर महिलेला तिरडीवरून आणून 108 रुग्णवाहिकेमध्ये ठेवले. त्यानंतर तिला उपचारासाठी केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी डॉ. सरनोबत यांनी त्या महिलेची भेट घेऊन तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी खानापूर तालुक्यामध्ये आजही वैद्यकीय व वाहतूक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे तेथील दुर्गम भागातील लोकांची परिस्थिती बिकट आहे. तेव्हा या गावांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, टेलीमेडिसीन किंवा मोबाईल हेल्थ युनिट या सुविधाही द्याव्यात, अशी मागणीही डॉ. सोनाली सरनोबत यांनी यावेळी केली आहे.