डॉ. राजेंद्र प्रसाद जयंती

Dr. Rajendra Prasad Jayanti : आज 3 डिसेंबरला देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती आहे. डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. संविधान निर्मितीतही त्यांनी महत्त्वाची …

डॉ. राजेंद्र प्रसाद जयंती

Dr. Rajendra Prasad Jayanti : आज 3 डिसेंबरला देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती आहे. डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. संविधान निर्मितीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच राजेंद्र प्रसाद यांच्या संघर्षाची कहाणी अनेक शाळांमध्ये मुलांना सांगितली जात आहे.  

 

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1844 रोजी बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील जिरादेई येथे झाला. त्यांची आई आणि मोठा भाऊ महेंद्र यांच्याबद्दल त्यांचे मनापासून प्रेम होते. वयाच्या पाचव्या वर्षी राजेंद्र प्रसाद यांनी मौलवी साहेबांकडून फारसी शिकायला सुरुवात केली. त्यानंतर ते प्राथमिक शिक्षणासाठी छपरा जिल्हा शाळेत गेले. नंतर वयाच्या 13 व्या वर्षी राजेंद्र बाबू यांचा विवाह राजवंशी देवी यांच्याशी झाला. त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते. मग उच्च शिक्षणासाठी कोलकाता विद्यापीठात प्रवेश घेतला आणि नंतर डॉक्टरेट पदवीही मिळवली. नंतर त्यांनी 1915 मध्ये मास्टर ऑफ लॉ परीक्षा सुवर्णपदकासह उत्तीर्ण केली आणि नंतर कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासोबतच राज्यघटना निर्मितीत महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.डॉ. राजेंद्र प्रसाद भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. सुभाषचंद्र बोस यांच्या राजीनाम्यानंतर 1937मध्ये काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष  म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो ठराव मंजूर केला. त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांना अटक करून बांकीपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले, जिथे त्यांनी पुढील तीन वर्षे घालवली. मग नंतर 1945 मध्ये त्यांची सुटका झाली.

 

त्यानंतर 1946 मध्ये, जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये त्यांची अन्न आणि कृषी मंत्री म्हणून निवड झाली. 26 जानेवारी 1950 रोजी ते भारतीय प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. 1952 आणि 1957 मध्ये ते पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवडून आले. भारताच्या इतिहासात ही कामगिरी करणारे ते एकमेव राष्ट्रपती आहे. तसेच राष्ट्रवादी चळवळीदरम्यान आणि भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळात देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांना 1962 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला.  

Edited By- Dhanashri Naik