भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले असे जाहीर करा
डॉ . जयेंद्र परुळेकरांचा निवडणूक आयोगाला टोला
सावंतवाडी । प्रतिनिधी
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता आता निवडणूक आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपचेच नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले असे जाहीर करावे .निदान निवडणूक प्रक्रियेचा कोट्यवधी रुपयांचा जनतेचा खर्च तरी वाचेल असा टोला सामाजिक कार्यकर्ते डॉ . जयेंद्र परुळेकर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे . परुळेकर म्हणाले , बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 7 लाख 42 हजार अधिकृत मतदार असताना निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर या दोन चरणांमध्ये एकूण ७ कोटी ४५ लाख मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे एकूण मतदारांपेक्षा ३ लाख मतदान जास्त झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे बिहारप्रमाणेच असाच प्रकार महाराष्ट्रात होणार असेल तर निवडणूका घेण्याचा फार्स कशाला?असा सवाल परुळेकर यांनी विचारत बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल बघता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल काय लागणार हे आत्ताच सांगणं सहज सोप्पं आहे असे म्हणत निवडणूक आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपचेच नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले असे जाहीर करावे अशी टीका डॉ . परुळेकर यांनी केली आहे .
Home महत्वाची बातमी भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले असे जाहीर करा
भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले असे जाहीर करा
डॉ . जयेंद्र परुळेकरांचा निवडणूक आयोगाला टोला सावंतवाडी । प्रतिनिधी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता आता निवडणूक आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपचेच नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले असे जाहीर करावे .निदान निवडणूक प्रक्रियेचा कोट्यवधी रुपयांचा जनतेचा खर्च तरी वाचेल असा टोला सामाजिक कार्यकर्ते डॉ . जयेंद्र परुळेकर यांनी जारी केलेल्या […]
