डॉ. प्रभाकर कोरे यांना डॉ.हळकट्टी पुरस्कार प्रदान

बेंगळूर येथील समारंभात मान्यवरांचा सहभाग बेळगाव : केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांना प्रतिष्ठेचा डॉ. फ. गु. हळकट्टी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगळवारी बेंगळूर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात आला. डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह सानेहळ्ळी येथील डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल तर डॉ. तेजस्विनी अनंतकुमार यांना सामाजिक क्षेत्रात सेवेबद्दल हा पुरस्कार […]

डॉ. प्रभाकर कोरे यांना डॉ.हळकट्टी पुरस्कार प्रदान

बेंगळूर येथील समारंभात मान्यवरांचा सहभाग
बेळगाव : केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांना प्रतिष्ठेचा डॉ. फ. गु. हळकट्टी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगळवारी बेंगळूर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात आला. डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह सानेहळ्ळी येथील डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल तर डॉ. तेजस्विनी अनंतकुमार यांना सामाजिक क्षेत्रात सेवेबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. कायदा व संसदीय व्यवहार मंत्री एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉ. फ. गु. हळकट्टी फाऊंडेशनच्या ट्रस्टी शीला हळकट्टी व मनू बळीगार उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारून डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, वचनपितामह फ. गु. हळकट्टी यांनी बाराव्या शतकातील संतांचे वचन संग्रहित केले नसते तर आज त्यांचा अभ्यास करणे शक्य झाले नसते. वचनसाहित्य व समाजाला त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. फ. गु. हळकट्टी, त्यागवीर शिरसंगी लिंगराज आदी महनीयांचे चरित्र युवा पिढीसमोर मांडण्याची गरज आहे. शिक्षण, साहित्य, सहकार, कृषी, वृत्तपत्र, लघुउद्योग आदी सर्व क्षेत्रात त्यांनी सेवा बजावली आहे. अशा महनीयांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला, याचा अभिमान वाटतो.