टे.टे. स्पर्धेत जीआयटीला दुहेरी मुकूट

बेळगाव : हल्याळ येथे व्हिडीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हिटीयु चषक सिंगल झोन टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या जीआयटी महाविद्यालयाच्या टेबल टेनिस पुरूष पुरूष संघाने अंतिम संघाने जैन तांत्रिक महाविद्यालय संघाचा तर महिला संघाने जैन तांत्रिक संघाचा पराभव करुन विजेतेपदकासह दुहेरी मुकूट पटकाविले. व्हिटीयु टेबल टेनिस स्पर्धेत पुरूष गटात उपांत्यफेरीच्या सामन्यात केएलएस जीआयटी संघाने केएलएस व्हिडीआयटी हल्याळ […]

टे.टे. स्पर्धेत जीआयटीला दुहेरी मुकूट

बेळगाव : हल्याळ येथे व्हिडीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हिटीयु चषक सिंगल झोन टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या जीआयटी महाविद्यालयाच्या टेबल टेनिस पुरूष पुरूष संघाने अंतिम संघाने जैन तांत्रिक महाविद्यालय संघाचा तर महिला संघाने जैन तांत्रिक संघाचा पराभव करुन विजेतेपदकासह दुहेरी मुकूट पटकाविले. व्हिटीयु टेबल टेनिस स्पर्धेत पुरूष गटात उपांत्यफेरीच्या सामन्यात केएलएस जीआयटी संघाने केएलएस व्हिडीआयटी हल्याळ संघाचा 3-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जैन तांत्रिक महाविद्यालयाचा एस. जी. बाळेकुंद्री संघाचा 3-1 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात जीआयटी महाविद्यालयाने जैन सी.ई. तांत्रिक महाविद्यालय संघाचा कडव्या लढीतीत 3-2 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
या संघात सिध्दांत पानारी, आर्यन मोहीते, अॅरॉन डिसोजा, संकल्प शिंदे, राहुल पाटील आदी खेळाडूंचा समावेश आहे. महिलांच्या गटात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जीआयटी बेळगाव संघाने जैन संघाचा 3-0 असा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात केएलएस व्हिडीआयटी हल्याळ संघाने केएलई संघाचा पराभव करुन अंतिफ फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात जीआयटी बेळगाव संघाने केएलएस व्हिडीआयटी हल्याळ संघाचा 3-0 सरळ सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या महिला संघात स्मिता माने, सृष्टी मेणसे, सृष्टी गुर्जर व समृध्दी चव्हाण आदी खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला जीआयटीचे क्रीडा प्रा. आकाश मंडोळकर, सुभश्वा शिखरे ओझस रेवणकर व यांचे प्रोत्साहन लाभत आहे.