लोककल्पतर्फे दारोळीत दंतचिकित्सा शिबिर उत्साहात

बेळगाव : लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फौंडेशन व केएलई डेंटल हॉस्पिटलतर्फे 12 जानेवारी रोजी दारोळी गावात दंतचिकित्सा शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी मौखिक आरोग्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच नियमित ब्रश करणे, फ्लॉसिंग व नियमित दंत तपासणी यावर भर देण्यात आला. शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना टुथब्रश देण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे सूरजसिंग राजपूत, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे, हॉस्पिटलचे पीआरओ […]

लोककल्पतर्फे दारोळीत दंतचिकित्सा शिबिर उत्साहात

बेळगाव : लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फौंडेशन व केएलई डेंटल हॉस्पिटलतर्फे 12 जानेवारी रोजी दारोळी गावात दंतचिकित्सा शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी मौखिक आरोग्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच नियमित ब्रश करणे, फ्लॉसिंग व नियमित दंत तपासणी यावर भर देण्यात आला. शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना टुथब्रश देण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे सूरजसिंग राजपूत, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे, हॉस्पिटलचे पीआरओ सागर व डॉक्टर उपस्थित होते.