‘सनबर्न’वरून उगाच कांगावा नको

कंपनीकडून अद्याप दक्षिण गोव्यासाठी कागदपत्रांची पूर्तता नाही : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे स्पष्टीकरण पणजी : दक्षिण गोव्यातील किटला येथे सनबर्न आयोजित करण्यासाठी आयोजक कंपनीने  कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. सरकारने कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे विरोधकांनी सनबर्नला विरोध करण्याचा उगाच कांगावा कऊ नये, असा टोला पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत हाणला. सनबर्न दक्षिण गोव्यात होऊ नये, यासाठी ठाम असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर रोहन खंवटे यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले. […]

‘सनबर्न’वरून उगाच कांगावा नको

कंपनीकडून अद्याप दक्षिण गोव्यासाठी कागदपत्रांची पूर्तता नाही : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे स्पष्टीकरण
पणजी : दक्षिण गोव्यातील किटला येथे सनबर्न आयोजित करण्यासाठी आयोजक कंपनीने  कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. सरकारने कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे विरोधकांनी सनबर्नला विरोध करण्याचा उगाच कांगावा कऊ नये, असा टोला पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत हाणला. सनबर्न दक्षिण गोव्यात होऊ नये, यासाठी ठाम असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर रोहन खंवटे यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले.
सभागृहातील चर्चेनंतर छापणावळ, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन खात्याच्या मागण्यांना सभागृहात मान्यता दिली. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा 33 बैठका घेतल्यानंतर निश्चित करण्यात आला असून, सर्व आमदारांना विश्वासात घेऊन पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे. यंदाच्या पर्यटन मोसमासाठी शॅक्सच्या नूतनीकरणाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने यापूर्वीच सुरू झाली असून येत्या 30 सप्टेंबरपूर्वी शॅक्स कार्यान्वित केले जातील. महिला सशक्तीकरणासाठी माहिती केंद्र योजना 30 सप्टेंबरपर्यंत लागू करण्यात येणार असल्याचेही मंत्री खंवटे यांनी सभागृहात सांगितले.
फर्मागुढी-फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पर्यटन खात्यातर्फे साहाय्य केले जाणार आहे. राज्यात देशी तसेच विदेशी पर्यटकांचा आकडा वाढत असल्याने दाबोळी विमानतळावर 4.1 दशलक्ष प्रवासी आल्याची माहिती त्यांनी दिली. डीजिटलायझेशन यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना मंत्री खंवटे यांनी, स्टार्टअपचे काम आम्ही बिगर गोमंतकीयांना न देता स्थानिकांनाच दिलेले आहे. थ्रीडी प्रिंटिंग मशिन आणून त्याद्वारे डीजिटलायझेशनवर भर देण्यात आला आहे, असे सांगितले.
आयटी क्षेत्रात 2 ते 3 हजार रोजगाराच्या संधी
माहिती तंत्रज्ञान खात्याच्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युपॅक्चरिंग क्लस्टरचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून आयटी क्षेत्रात येत्या काही दिवसात 2 ते 3 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
किनारा स्वच्छतेसाठी एजन्सी स्थापन करणार 
समुद्रकिनारा स्वच्छता प्रक्रियेसाठी नवीन निविदांवर पर्यटन खाते काम करत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी नवीन एजन्सी स्थापन केली जाईल. त्यानंतर तीन वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल. विरोधकांनी किनारा स्वच्छतासंबंधी केलेला भ्रष्टाचाराचा आरोप स्व. मनोहर पर्रीकर सरकारच्या काळातील असल्याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
युरी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी
दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजकांनी सरकारकडे कागदपत्रांची पूर्तता न करता ऑनलाईन पद्धतीने तिकीट विक्री सुऊ केली असेल तर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आयोजकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली. या विषयावर त्यांनी आक्रमक होत मंत्र्यांकडे उत्तर मागितले.