मानवाधिकारांवरून भारताला धडे देऊ नका!

अमेरिकेच्या खासदारांनी स्वत:च्या सरकारला सुनावले : अमेरिकेच्या लोकशाहीतही त्रुटी वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेत ‘देसी डिसाइड्स’ नावाची एक परिषद झाली असून यात अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या लोकांच्या प्रभावावर चर्चा झाली. यावेळी अमेरिकेने मानवाधिकारांच्या मुद्द्यावर भारताच्या नेतृत्वाशी चर्चा करावी. भारतावर शेकडो वर्षे विदेशी राजवट होती. जेव्हा तुम्ही भारताला मानवाधिकारांवर लेक्चर द्याल तेव्हा ते तुमचे म्हणणे ऐकून घेणार नसल्याचे […]

मानवाधिकारांवरून भारताला धडे देऊ नका!

अमेरिकेच्या खासदारांनी स्वत:च्या सरकारला सुनावले : अमेरिकेच्या लोकशाहीतही त्रुटी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत ‘देसी डिसाइड्स’ नावाची एक परिषद झाली असून यात अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या लोकांच्या प्रभावावर चर्चा झाली. यावेळी अमेरिकेने मानवाधिकारांच्या मुद्द्यावर भारताच्या नेतृत्वाशी चर्चा करावी. भारतावर शेकडो वर्षे विदेशी राजवट होती. जेव्हा तुम्ही भारताला मानवाधिकारांवर लेक्चर द्याल तेव्हा ते तुमचे म्हणणे ऐकून घेणार नसल्याचे खासदार आर. ओ. खन्ना यांनी अमेरिकेच्या प्रशासनाला सुनावले आहे.
या परिषदेत भारतीय खासदारांना पंतप्रधान मोदी आणि मुस्लीम समुदाय यांच्यातील संबंधांवरून प्रश्न विचारण्यात आला. भारत लेक्चर ऐकण्याऐवजी स्वत:च्या लोकशाहीतील त्रुटी दूर करेल. तर अमेरिकेने देखील स्वत:च्या चुका मान्य कराव्यात. भारतासोबत चर्चा करण्याची हीच योग्य पद्धत असल्याचे खन्ना यांनी स्पष्ट केले. खन्ना यांच्या या मताशी अन्य भारतीय वंशाचे खासदार बेरा यांनी सहमती दर्शविली आहे.
भारतीय विदेश मंत्र्यांसोबत मानवाधिकारांच्या मुद्द्यांवर मी चर्चा केली होती. भारताने जर स्वत:ची धर्मनिरपेक्ष प्रतिमा गमावली तर यामुळे उर्वरित जगासमोर भारत स्वत:ची ओळखच गमावून बसेल असे त्यांना सांगितले होते. आमच्याकडे अद्याप जिवंत लोकशाही आहे, आमच्याकडे एक विरोधी पक्ष आहे. आम्ही प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो. भारतात लोकशाही जिवंत राहील अशी मी अपेक्षा करतो, असे उद्गार बेरा यांनी काढले आहेत.
भारताकडे दुर्लक्ष करता येणार नाही
खासदार म्हणून आम्हाला स्वत:च्या आणि इतर देशांवर टीका करण्याची हिंमत असायला हवी. भारत आर्थिकदृष्ट्या अमेरिकेसाठी महत्त्वपूर्ण भागीदार आहे. परंतु अमेरिकेने स्वत:च मूल्यांविषयीही विचार करावा. अमेरिका चीनमधील उइगूर मुस्लिमांवरील अत्याचाराप्रकरणी टीका करत असेल तर त्याने भारतात काय घडतंय हे देखील पाहणे गरजेचे आहे. हे सर्व म्हटल्याने मला वाईट ठरविले जाईल याची जाणीव आहे, परंतु तरीही मी चुकीचे घडल्यावर टीका करेन, कारण असे न करणे अमेरिकेच्या मूल्यांच्या विरोधात असेल, असा दावा भारतीय वंशाच्या खासदार प्रतिमा जयपाल यांनी केला आहे.