राजारामनगरातील दत्त मंदिराची दानपेटी फोडली
सुमारे लाखाची रोकड लंपास : चोरी सीसीटीव्हीत कैद
बेळगाव : जीआयटी रोड, राजारामनगर, उद्यमबाग येथील दत्त मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे लाखाची रक्कम पळविली आहे. या घटनेने भाविकांत खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वीच या मंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती. दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हभप शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी कुलूप फोडून मंदिरात प्रवेश करून दानपेटीतील रक्कम पळविली आहे. यासंबंधी नागराज महादेव पुजार यांनी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मध्यरात्री 2.30 ते 3 यावेळेत ही घटना घडली आहे.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी मंदिराचे पुजारी पूजेसाठी आले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. सतत पाच-सहा दिवस कार्यक्रमात असणारे पदाधिकारी गुरुवारीही मंदिरात बसून होते. रात्री 12 पर्यंत चर्चा करून 12.30 नंतर झोपण्यासाठी ते सर्व जण आपापल्या घरी गेले होते. त्याचवेळी दोघा अज्ञातांनी मंदिरात प्रवेश करून लोखंडी रॉडने दानपेटीला लावलेले कुलूप फोडले आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच मंदिर कमिटीचे अध्यक्ष नागराज पुजार, उपाध्यक्ष विशाल पाटील, सचिव अजित दोडमणी, बापू सातगौडा, यल्लाप्पा झेंडे आदी मंदिरात जमले. भाविकांनीही गर्दी केली होती. मंदिरातील दानपेटीत सुमारे 90 हजार ते लाखापर्यंतची रक्कम होती.
घरापाठोपाठ आता मंदिरेही लक्ष्य
गेल्या पंधरा दिवसांपासून वडगाव, शहापूर, अनगोळ परिसरात सुरू असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांच्या सत्राने नागरिक हैराण झाले असतानाच चोरट्यांनी आता मंदिरांनाही लक्ष्य बनविले आहे. दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात भेट दिलेल्या भाविकांची संख्या मोठी होती. त्यामुळे दानपेटीत सुमारे 90 हजार ते लाखापर्यंत रक्कम जमा झाली होती. ही रक्कम चोरट्यांनी पळविली आहे.
Home महत्वाची बातमी राजारामनगरातील दत्त मंदिराची दानपेटी फोडली
राजारामनगरातील दत्त मंदिराची दानपेटी फोडली
सुमारे लाखाची रोकड लंपास : चोरी सीसीटीव्हीत कैद बेळगाव : जीआयटी रोड, राजारामनगर, उद्यमबाग येथील दत्त मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे लाखाची रक्कम पळविली आहे. या घटनेने भाविकांत खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वीच या मंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती. दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन […]