डोंबिवली : एकनाथ शिंदे पक्षाचे दिनेश म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश

शिवसेना शिंदे गटातील युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने केवळ शिंदे गटाला नाही तर भाजपला देखील याचा फटका बसू शकतो. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आता ठाकरे गटाकडून म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेल्यास त्यांचे कडवे आव्हान चव्हाण यांच्या समोर असणार आहे. संघ परिवारासोबतच ठराविक समाजाची मते ही आत्तापर्यंत भाजपच्या पारड्यात पडत आली आहेत. मात्र भाजपमधील अंतर्गत वाद, शिवसेना शिंदे गटातील फूट याचा काहीसा फटका बसू शकतो. त्यासोबतच दिपेश यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांचे एक वेगळेच प्रस्थ ठाणे जिल्ह्यात राहीले आहे. वडीलांची राजकीय ताकद ही दिपेश यांच्या फायद्याची ठरू शकते. त्यामुळे आता भाजप किती गांर्भियाने ही गोष्ट घेते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. जनसंघापासून डोंबिवली विधानसभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप विचारसरणीचा प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जगन्नाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील यांच्यानंतर 2009 साली आमदार रविंद्र चव्हाण हे येथून निवडून आले. लोकसभेसाठी ही जागा महायुतीमधील शिवसेनेकडे जात असली तरी गेल्या अनेक वर्षापासून एका ठराविक विचारसरणीतून येथील मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे. चव्हाण हे 15 वर्षाच्या कार्यकाळात एकदा राज्यमंत्री आणि सध्या ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. चव्हाण यांचा जनसंपर्क दांडगा आहे. विधानसभेत रविंद्र चव्हाण हे 2009 सोडले तर 2014 आणि 2019 च्या निवडणूकीत 40 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहे. 2009 मध्ये मनसेचे राजेश कदम यांनी चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली. 2014 मध्ये शिवसनेचे दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविली. तर 2019 मध्ये मनसेचे मंदार हळबे यांनी निवडणूक लढविली. या तिन्ही निवडणूकीत चव्हाण यांनी मताधिक्य राखत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारली होती. एकीकडे गेल्या तीन सत्रांपासून येथील आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले रविंद्र चव्हाण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी अनेक इच्छुकांनी त्यांच्या विरोधात आपापल्या परिने तयारी सुरू केली आहे. भाजप मधून मंदार हळबे, राहूल दामले हे देखील आमदारकी लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा असून ते तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत.

डोंबिवली : एकनाथ शिंदे पक्षाचे दिनेश म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश

शिवसेना शिंदे गटातील युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने केवळ शिंदे गटाला नाही तर भाजपला देखील याचा फटका बसू शकतो. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आता ठाकरे गटाकडून म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेल्यास त्यांचे कडवे आव्हान चव्हाण यांच्या समोर असणार आहे.संघ परिवारासोबतच ठराविक समाजाची मते ही आत्तापर्यंत भाजपच्या पारड्यात पडत आली आहेत. मात्र भाजपमधील अंतर्गत वाद, शिवसेना शिंदे गटातील फूट याचा काहीसा फटका बसू शकतो. त्यासोबतच दिपेश यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांचे एक वेगळेच प्रस्थ ठाणे जिल्ह्यात राहीले आहे. वडीलांची राजकीय ताकद ही दिपेश यांच्या फायद्याची ठरू शकते. त्यामुळे आता भाजप किती गांर्भियाने ही गोष्ट घेते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. जनसंघापासून डोंबिवली विधानसभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप विचारसरणीचा प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जगन्नाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील यांच्यानंतर 2009 साली आमदार रविंद्र चव्हाण हे येथून निवडून आले.लोकसभेसाठी ही जागा महायुतीमधील शिवसेनेकडे जात असली तरी गेल्या अनेक वर्षापासून एका ठराविक विचारसरणीतून येथील मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे. चव्हाण हे 15 वर्षाच्या कार्यकाळात एकदा राज्यमंत्री आणि सध्या ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. चव्हाण यांचा जनसंपर्क दांडगा आहे. विधानसभेत रविंद्र चव्हाण हे 2009 सोडले तर 2014 आणि 2019 च्या निवडणूकीत 40 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहे. 2009 मध्ये मनसेचे राजेश कदम यांनी चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली. 2014 मध्ये शिवसनेचे दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविली.तर 2019 मध्ये मनसेचे मंदार हळबे यांनी निवडणूक लढविली. या तिन्ही निवडणूकीत चव्हाण यांनी मताधिक्य राखत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारली होती. एकीकडे गेल्या तीन सत्रांपासून येथील आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले रविंद्र चव्हाण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी अनेक इच्छुकांनी त्यांच्या विरोधात आपापल्या परिने तयारी सुरू केली आहे. भाजप मधून मंदार हळबे, राहूल दामले हे देखील आमदारकी लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा असून ते तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत.

Go to Source