सतत कंबर दुखत असेल तर करा हे योगासन
रोज कंबर दुखते का? कंबर दुखी पासून आराम मिळावा म्हणून करा चतुरंग दंडासन. चतुरंग दंडासन हे सूर्य नमस्कार करतांना केले जाणारे एक आसन आहे. जाणून घ्या फायदे आणि करण्याची पद्धत
रोजच्या दैनंदिन जीवनात योगासन सहभागी करणे गरजेचे असते. योगासने हे शरीराला लवचिक बनवता तसेच आरोग्य देखील चांगले राहते. चतुरंग दंडासन हे सूर्यनमस्कार दरम्यान केले जाणारे आसनांपैकी एक आहे. चतुरंग दंडासन केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम मिळेल.
चतुरंग दंडासन कसे करावे?
चतुरंग दंडासन करण्यासाठी दोघे पाय मागे आणि हाथ पुढे ठेऊन बसावे. मग श्वास घेत राहावा आणि आपल्या दोघो टाचांना पसरवावे म्हणजे मांड्यानवर दबाव असल्याची जाणीव होईल. आता हातांना पुढे करून जमिनीवर टेकवावे. तसेच तुमच्या खांद्यांना कानांपासून दूर ठेवावे.
चतुरंग दंडासन करण्याचे फायदे
1. चतुरंग दंडासन केल्यामुळे पाठीच्या मणक्याची सहनशक्ती वाढते. तसेच स्नायूंचा मजबूतपणा वाढतो, पाठीचे दुखणे कमी होते.
2. चतुरंग दंडासन हे तणाव कमी करण्यासाठी मदत करते तसेच हृदय आरोग्यदायी राहते.
3. चतुरंग दंडासन केल्यास ब्लड सर्कुलेशन नियंत्रित राहते. तसेच मेंदूपर्यंत रक्त पुरवठा सुरळीत करते. तसेच त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik