काळजीपूर्वक मतदान-मतमोजणीचे काम करा

मनपामध्ये कार्यशाळेचे आयोजन बेळगाव : लोकसभेसाठी दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया राबविण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी कार्यशाळा झाली. यावेळी मतदान कशाप्रकारे करून घ्यायचे, मतमोजणी करताना कोणती खबरदारी घ्यायची, याची माहिती देण्यात आली. […]

काळजीपूर्वक मतदान-मतमोजणीचे काम करा

मनपामध्ये कार्यशाळेचे आयोजन
बेळगाव : लोकसभेसाठी दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया राबविण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी कार्यशाळा झाली. यावेळी मतदान कशाप्रकारे करून घ्यायचे, मतमोजणी करताना कोणती खबरदारी घ्यायची, याची माहिती देण्यात आली. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी पोस्टल मतदान देऊन त्यांच्याकडून मतदान करून घेणे याबाबतही माहिती दिली आहे. अत्यंत काळजीपूर्वक मतदान व मतमोजणीचे काम करावे, अशी सूचना करण्यात आली. मतदान केंद्रांवर वेळेवर पोहोचणे, मतदान प्रक्रिया राबविताना कोणतीही चूक होऊ नये, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. या कार्यशाळेला महानगरपालिका, तसेच इतर नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदचे कर्मचारी उपस्थित होते.