शिंदीकुरबेट ग्रा.पं.ची सखोल चौकशी करा

पोतदार कुटुंबीयांची पत्रकार परिषदेत मागणी बेळगाव : गोकाक तालुक्यातील शिंदीकुरबेट ग्राम पंचायतीमध्ये बेकायदेशीर प्रकार वाढले आहेत. परस्पर नावे बदलून मालमत्ता लाटण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये ग्राम पंचायत पीडीओ, अध्यक्ष आणि सदस्यांचा हात आहे. या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी शिंदीकुरबेट येथील पोतदार कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ग्राम पंचायत पीडीओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी […]

शिंदीकुरबेट ग्रा.पं.ची सखोल चौकशी करा

पोतदार कुटुंबीयांची पत्रकार परिषदेत मागणी
बेळगाव : गोकाक तालुक्यातील शिंदीकुरबेट ग्राम पंचायतीमध्ये बेकायदेशीर प्रकार वाढले आहेत. परस्पर नावे बदलून मालमत्ता लाटण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये ग्राम पंचायत पीडीओ, अध्यक्ष आणि सदस्यांचा हात आहे. या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी शिंदीकुरबेट येथील पोतदार कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ग्राम पंचायत पीडीओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी संगनमताने बेकायदेशीर मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला आहे. पोतदार कुटुंबीयांनी 1992 रोजी मालमत्ता खरेदी करून गोकाक उपनोंदणी कार्यालयात रितसर नोंद केली आहे. मात्र ग्राम पंचायत पीडीओ आणि इतर सदस्यांनी परस्पर ही मालमत्ता दुसऱ्याच्या नावे केली आहे. बेकायदेशीर मालमत्ता हस्तांतराचा प्रकार घडला आहे. याबाबत घटप्रभा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे ग्राम पंचायतीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. याबाबत तालुका आणि जिल्हा पंचायतीकडे तक्रार दिली आहे. संबंधितांनी पीडीओ, अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व सदस्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. तातडीने या गैरप्रकारातील सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणीही पोतदार कुटुंबीयांनी केली आहे.