दिवाळी विशेष फराळ गोड आणि खुसखुशीत शंकरपाळी पाककृती
साहित्य-
मैदा-एक वाटी
पिठी साखर- अर्धा वाटी
तूप-१/४ वाटी
दूध- १/४वाटी
मीठ चिमूटभर
तेल किंवा तूप- तळण्यासाठी
ALSO READ: दिवाळी फराळ स्पेशल : करंजी
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात तूप आणि पिठी साखर एकत्र करून चांगले मिक्स करा. आता त्यात मैदा आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करा. हळूहळू दूध घालून कणिक मळा. कणकेला १५ मिनिटे झाकून ठेवा. आता कणकेचे लहान गोळे बनवून पातळ लाटा. चाकूने चौकोनी आकारात कापून घ्या. मध्यम आचेवर तेलात किंवा तुपात शंकरपाळ्या सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. तसेच शंकरपाळ्या खुसखुशीत ठेवण्यासाठी साखरेचे प्रमाण योग्य ठेवा आणि जास्त तळू नका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: दिवाळी फराळ रेसिपी : खमंग शेव
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: दिवाळीला बनवा पारंपरिक महाराष्ट्रीयन पोह्याचा चिवडा पाककृती