दिवाळीच्या गडबडीत कमी वेळात आणि झटपट फराळ तयार करायचा असेल, तर अवघ्या ३० मिनिटांत बनणारे ५ सोपे आणि चवदार पदार्थ जाणून घ्या…
१. इन्स्टंट पोहा चिवडा
वेळ: १५ ते २० मिनिटे
कृती: पातळ पोहे कढईत मंद आचेवर न ते लता खमंग भाजून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये २-३ चमचे तेलात शेंगदाणे, डाळव, सुक्या खोबऱ्याचे काप, कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून घ्या. त्यात हळद, हिंग, मीठ आणि पिठीसाखर घालून ही फोडणी भाजलेल्या पोह्यांवर ओता आणि हलक्या हाताने मिक्स करा.
२. गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी
वेळ: २५ ते ३० मिनिटे
कृती: अर्धी वाटी गरम दूध, अर्धी वाटी पिठीसाखर आणि ४ चमचे साजूक तूप एकत्र करा. त्यात मावेल तितके गव्हाचे पीठ घालून घट्ट गोळा मळून घ्या. १० मिनिटे ठेवा, नंतर चपातीसारखे लाटून चौकोनी तुकडे कापा आणि मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
३. रवा-नारळ लाडू (बिना पाकाचे)
वेळ: २० ते २५ मिनिटे
कृती: कढईत २ चमचे तूप गरम करून १ वाटी बारीक रवा खमंग भाजा. त्यात १/२ वाटी किसलेले सुके किंवा ओले खोबरे घालून २ मिनिटे परता. गॅस बंद करून मिश्रण थोडे कोमट झाल्यावर त्यात पाऊण वाटी पिठीसाखर, वेलची पूड आणि २-३ चमचे कोमट दूध घालून लाडू वळून घ्या.
४. इन्स्टंट ब्रेड किंवा रव्याची चकली
वेळ: २५ मिनिटे
कृती: १ वाटी पाण्यात १ लहान चमचा तेल, मीठ, तिखट, ओवा आणि तीळ घालून उकळी आणा. त्यात १ वाटी रवा घालून वाफ काढून घ्या. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर व्यवस्थित मळून सोऱ्यात (चकलीच्या साच्यात) भरा. चकल्या पाडून गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
५. चॉकलेट-कोकोनट लाडू
वेळ: १० ते १५ मिनिटे
कृती: १ चमचा तुपात २ वाट्या डेसिकेटेड कोकोनट १-२ मिनिटे परता. त्यात १/२ वाटी कंडेन्स्ड मिल्क आणि २ चमचे कोको पावडर घाला. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा, कोमट असतानाच गोल लाडू वळा आणि सुक्या खोबऱ्याच्या खिसात घोळवून घ्या.
ALSO READ: दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: दिवाळीच्या फराळात हेल्दी पर्याय हवेत? भाजलेले मखाणे, खजूर बाइट्स आणि ड्रायफ्रूट स्नॅक्स