खांडू यांच्याकडून विभागवाटप घोषित

वृत्तसंस्था / इटानगर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी नवनियुक्त मंत्र्यांना विभागवाटप केले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री चौना मेन यांच्याकडे अर्थविभागाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले असून आणखी एक उपमुख्यमंत्री मामा नाटुंग यांना गृहविभाग देण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी खांडू मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. या राज्यात भारतीय जनता पक्षाने सलग तीनदा सत्ता मिळविली आहे. या राज्यात लोकसभेसमवेत विधानसभा […]

खांडू यांच्याकडून विभागवाटप घोषित

वृत्तसंस्था / इटानगर
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी नवनियुक्त मंत्र्यांना विभागवाटप केले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री चौना मेन यांच्याकडे अर्थविभागाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले असून आणखी एक उपमुख्यमंत्री मामा नाटुंग यांना गृहविभाग देण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी खांडू मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. या राज्यात भारतीय जनता पक्षाने सलग तीनदा सत्ता मिळविली आहे.
या राज्यात लोकसभेसमवेत विधानसभा निवडणूकही झाली होती. 2 जूनला विधासभेसाठीची मतगणना झाली. एकंदर 60 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 46 जागांवर स्वबळावर विजय मिळविला. तर भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षाला 5 जागा मिळाल्या. अशा प्रकारे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने या राज्यात तीन चतुर्थांशापेक्षाही अधिक बहुमत मिळविले आहे. पेमा खांडू यांनी त्यानंतर सलग तिसऱ्यांना मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. खांडू मंत्रिमंडळात 12 जण आहेत.