अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाची हत्या, तिघांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भायखळा विधानसभा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी उर्फ मुन्ना (45) यांची काही दिवसांपूर्वी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी भायखळा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या संदर्भात भायखळा पोलीस ठाण्यात (byculla police station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मुंबईतील (mumbai) भायखळा येथील रेतीवाला इंडस्ट्रीजसमोरील अनंत पवार रोडवर शुक्रवारी मध्यरात्री एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नजीकच्या काळाचौकी पोलिस ठाण्याची मोबाइल व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात आली. जखमी अवस्थेत कुर्मी यांना पोलिसांनी तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मानेवर, हातावर, पोटावर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केल्याचा संशय आहे.हल्लेखोर दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनी सचिन कुर्मी यांच्यावर हल्ला केला होता. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी तपास केला. तपासानुसार आरोपी बदलापूर येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. माहितीच्या आधारे आनंदा अशोक काळे उर्फ अन्या (39), विजय ज्ञानेश्वर काकडे उर्फ पप्या (34) आणि प्रफुल्ल प्रवीण पाटकर (26) यांना अटक करण्यात आली. काळे आणि काकडे हे दोघेही घोपदेव परिसरातील रहिवासी असून पाटकर हे आग्रीपाडा येथे राहतात. काळे उर्फ अन्याविरुद्ध बैकल, आग्रीपाडा, मानखुर्द, अँटॉप हिल आणि धारावी पोलीस ठाण्यात एकूण 10 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.काकडे उर्फ पप्याविरुद्ध भायखळा पोलिस ठाण्यात मारामारीचे गुन्हेही याआधी दाखल झालेल आहेत. तसेच पाटकर यांच्यावर भायखळा, अँटॉप हिल आणि धारावी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. याप्रकरणी आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन कुर्मी यांच्यामुळेच आमच्यावर खोटे आरोप दाखल झाले होते, असे त्यांचे मत होते. त्या रागातून आम्ही हत्या केल्याचे आरोपींनी म्हटले आहे. पोलिस आरोपींच्या या दाव्याची पडताळणी करत आहेत. सचिन कुर्मी हे राष्ट्रवादीचे नेते (ncp) आणि मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय होते. ते अनेक वर्षांपासून भुजबळ कुटुंबाचे कट्टर समर्थक होते. भुजबळ कुटुंबीयांनी अजित पवार (ajit pawar) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सचिन कुर्मीही त्यांच्यासोबत गेले. ते राष्ट्रवादीचे (अजित पवार) भायखळा तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.हेही वाचाडेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणारमिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त मिळेना
Home महत्वाची बातमी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाची हत्या, तिघांना अटक
अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाची हत्या, तिघांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भायखळा विधानसभा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी उर्फ मुन्ना (45) यांची काही दिवसांपूर्वी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी भायखळा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
या संदर्भात भायखळा पोलीस ठाण्यात (byculla police station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईतील (mumbai) भायखळा येथील रेतीवाला इंडस्ट्रीजसमोरील अनंत पवार रोडवर शुक्रवारी मध्यरात्री एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नजीकच्या काळाचौकी पोलिस ठाण्याची मोबाइल व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात आली. जखमी अवस्थेत कुर्मी यांना पोलिसांनी तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मानेवर, हातावर, पोटावर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केल्याचा संशय आहे.
हल्लेखोर दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनी सचिन कुर्मी यांच्यावर हल्ला केला होता. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी तपास केला.
तपासानुसार आरोपी बदलापूर येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. माहितीच्या आधारे आनंदा अशोक काळे उर्फ अन्या (39), विजय ज्ञानेश्वर काकडे उर्फ पप्या (34) आणि प्रफुल्ल प्रवीण पाटकर (26) यांना अटक करण्यात आली.
काळे आणि काकडे हे दोघेही घोपदेव परिसरातील रहिवासी असून पाटकर हे आग्रीपाडा येथे राहतात. काळे उर्फ अन्याविरुद्ध बैकल, आग्रीपाडा, मानखुर्द, अँटॉप हिल आणि धारावी पोलीस ठाण्यात एकूण 10 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
काकडे उर्फ पप्याविरुद्ध भायखळा पोलिस ठाण्यात मारामारीचे गुन्हेही याआधी दाखल झालेल आहेत. तसेच पाटकर यांच्यावर भायखळा, अँटॉप हिल आणि धारावी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झालेले आहेत.
याप्रकरणी आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन कुर्मी यांच्यामुळेच आमच्यावर खोटे आरोप दाखल झाले होते, असे त्यांचे मत होते. त्या रागातून आम्ही हत्या केल्याचे आरोपींनी म्हटले आहे. पोलिस आरोपींच्या या दाव्याची पडताळणी करत आहेत.
सचिन कुर्मी हे राष्ट्रवादीचे नेते (ncp) आणि मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय होते. ते अनेक वर्षांपासून भुजबळ कुटुंबाचे कट्टर समर्थक होते.
भुजबळ कुटुंबीयांनी अजित पवार (ajit pawar) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सचिन कुर्मीही त्यांच्यासोबत गेले. ते राष्ट्रवादीचे (अजित पवार) भायखळा तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.हेही वाचा
डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार
मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त मिळेना