जिल्हा पोलीसप्रमुखांचा आज फोन ईन कार्यक्रम
बेळगाव : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद हे मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी फोन ईन कार्यक्रम घेणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 12 पयर्तिं नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील पोलीस स्थानकात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाते आहे का? तुमच्या गावात वाहतुकीची समस्या आहे का? तुमच्या परिसरात मटका, जुगार, बेकायदा दारूविक्रीचा व्यवसाय फोफावला आहे का? याविषयी माहिती द्यायची आहे. 0831-2405226 या क्रमांकावर मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 12 पयर्तिं जिल्हा पोलीसप्रमुख नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकणार असून तक्रार करणाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक गुप्त ठेवण्यात येणार आहेत. महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन केले आहे.
Home महत्वाची बातमी जिल्हा पोलीसप्रमुखांचा आज फोन ईन कार्यक्रम
जिल्हा पोलीसप्रमुखांचा आज फोन ईन कार्यक्रम
बेळगाव : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद हे मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी फोन ईन कार्यक्रम घेणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 12 पयर्तिं नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील पोलीस स्थानकात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाते आहे का? तुमच्या गावात वाहतुकीची समस्या आहे का? तुमच्या […]