जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट
वैद्यकीय सुविधांची केली पाहणी
बेळगाव : ग्रामीण विकास आणि पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन कामांची पाहणी केली. रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. यामुळे रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला होता. अंजुम परवेज यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेत असल्याचा आरोप मध्यंतरी झाला होता. तसेच वैद्यकीय कर्मचारी वेळेत हजर होत नसल्याची तक्रारही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परवेज यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेत येत आहेत की नाही? याची पाहणी करण्यात आली आहे. डिजिटल हजेरी तपासण्यात आली आहे. रुग्णालयात असणाऱ्या वैद्यकीय सुविधांच्या चौकशीसह रुग्णांशी संवादही साधला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांनी बिम्स रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आहे. रुग्णालयातील डायलिसीस केंद्र, मेडिकल विभाग, बेड, सुविधांची पाहणी केली आहे. लवकरच सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी महेश कोणी, सीईओ राहुल शिंदे, डॉ. आण्णासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट
जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट
वैद्यकीय सुविधांची केली पाहणी बेळगाव : ग्रामीण विकास आणि पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन कामांची पाहणी केली. रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. यामुळे रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला होता. अंजुम परवेज यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेत असल्याचा आरोप मध्यंतरी […]