सर्व लोकसेवा फौंडेशनतर्फे गरजूंना साड्या वाटप

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व लोकसेवा फौंडेशन बेळगाव यांच्यावतीने गरजूंना साड्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. बेळगाव शहरातील विविध नवदुर्गा माता मंदिरांतील भाविकांनी अहेर म्हणून दिलेल्या साड्यांचा उपयोग वृद्धाश्र्रमातील महिलांना व ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना व्हावा यासाठी सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी घेतला आहे. त्यांनी चिन्नम्मा बसवंतय्या हिरेमठ, […]

सर्व लोकसेवा फौंडेशनतर्फे गरजूंना साड्या वाटप

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व लोकसेवा फौंडेशन बेळगाव यांच्यावतीने गरजूंना साड्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. बेळगाव शहरातील विविध नवदुर्गा माता मंदिरांतील भाविकांनी अहेर म्हणून दिलेल्या साड्यांचा उपयोग वृद्धाश्र्रमातील महिलांना व ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना व्हावा यासाठी सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी घेतला आहे. त्यांनी चिन्नम्मा बसवंतय्या हिरेमठ, देवराज कॉलनी वृद्धाश्र्रम, कुडची या ठिकाणी या साड्यांचे वितरण केले. या साड्या मिळाल्यामुळे वृद्ध महिलांनी वीरेश यांचे आभार मानले. त्यांच्यासोबत सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष, सदस्य तसेच एम. एस. चौगला वृद्धाश्र्रम इन्चार्ज व वृद्धाश्र्रमातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.