मनपा सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण

बेळगाव : सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण करण्यात येत आहे. मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना विभागवार रेनकोटचे वितरण करण्यात आले असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र रेनकोट देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सफाई कर्मचारी कष्टाचे आणि शहर स्वच्छतेचे काम करत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे मनपाचे […]

मनपा सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण

बेळगाव : सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण करण्यात येत आहे. मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना विभागवार रेनकोटचे वितरण करण्यात आले असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र रेनकोट देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सफाई कर्मचारी कष्टाचे आणि शहर स्वच्छतेचे काम करत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे मनपाचे कर्तव्य आहे. पाऊस जोरदार कोसळत आहे. या पावसातही हे कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली रेनकोटचे वितरण करण्यात आले. महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, राजशेखर डोणी यांच्यासह इतर नगरसेवकांनी या रेनकोटचे वितरण केले.