मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्य वितरण
बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या योजनांमधून लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण केले. मंत्री हेब्बाळकर यांच्या गृहकार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्यातर्फे शस्त्रचिकित्साची वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 1 लाखांची मदत देण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये सोय नसल्यास शिफारस पत्रावर खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांना 1 लाखांपर्यंतचा खर्च देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 2023-24 मध्ये प्रेमा गवळी (वय 7) या बालिकेला पायाची व हाताची बोटांवर उपचार केले आहेत. खासगी रुग्णालयामध्ये यासाठी 1.35 लाख खर्च करण्यात आला आहे. यामधील 1 लाख मदत देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.
विवाहासाठी प्रोत्साहन धन
विवाह प्रोत्साहन धन अंतर्गत दिव्यांगांना विवाहासाठी 50 हजारांची मदत देण्यात येत आहे. सदर मदत जोडप्याच्या जॉईंट बँक खात्यावर 5 वर्षांच्या अवधीसाठी ठेव ठेवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 2023-24 मध्ये तिघा जोडप्यांना मदत देण्यात आली आहे. शिलाई मशीन योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना मंत्र्यांच्या हस्ते यंत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी महिला आणि बाल कल्याण खात्याचे उपसंचालक बसवराजू ए. एम., जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर आदी अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्य वितरण
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्य वितरण
बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या योजनांमधून लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण केले. मंत्री हेब्बाळकर यांच्या गृहकार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्यातर्फे शस्त्रचिकित्साची वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 1 लाखांची मदत देण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या […]