अंगणवाड्यांतून मुदतबाह्या अन्नधान्याचे वितरण

खानापूर : तालुक्यातील काही अंगणवाड्यांतून मुदतबाह्या अन्नधान्यांच्या पाकिटांचे वितरण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वितरण करण्यात आलेली अन्नधान्यांची पाकिटे परत घेऊन नवी अन्नधान्य पाकिटे वितरण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. बालकल्याण खात्याकडून कुपोषण दूर करण्यासाठी गरोदर महिला आणि बालकाना पौष्टिक अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. यासाठी […]

अंगणवाड्यांतून मुदतबाह्या अन्नधान्याचे वितरण

खानापूर : तालुक्यातील काही अंगणवाड्यांतून मुदतबाह्या अन्नधान्यांच्या पाकिटांचे वितरण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वितरण करण्यात आलेली अन्नधान्यांची पाकिटे परत घेऊन नवी अन्नधान्य पाकिटे वितरण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. बालकल्याण खात्याकडून कुपोषण दूर करण्यासाठी गरोदर महिला आणि बालकाना पौष्टिक अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करून कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी पौष्टिक अन्नधान्याचा मोफत पुरवठा अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येतो. यात गूळ, शेंगा तसेच विविध कडधान्ये, गूळ यासह इतर साहित्याचे वितरण करण्यात येते.
गेल्या काहीवर्षापासून पाकिट बंद अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे.या पाकिटावर अन्नधान्याची मुदत छापण्यात येत आहे. तालुक्यातील काही अंगणवाड्यांतून या मुदतबाह्या पौष्टिक अन्नधान्याचे वितरण करण्यात आल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत त्यांनी स्थानिक ग्राम पंचायतीकडे तक्रार केली असून सीडीपीओंच्या कार्यालयात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे. याबाबत सीडीपीओ यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत जर काही मुदतबाह्या पाकिटांचे वितरण करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास ती अन्नधान्य पाकिटे पुन्हा मागवून नव्याने अन्नाधान्य पाकिटांचे वितरण करण्यात येईल, नागरिकांनी वितरण झालेली अन्नाधान्य पाकिटे वापरात आणू नये, ती अंगणवाडीच्या केंद्रात परत करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.