जि. पं. चा विभागीय अभियंता लोकायुक्तांच्या जाळ्यात
दहा हजाराची लाच घेताना खानापुरात लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले : पैशासाठी बिलाची अडवणूक
खानापूर : बेळगाव जिल्हा पंचायतीचे खानापूर तालुका विभागीय कार्यालयाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता दुरदुंडेश्वर महादेव बन्नूर यांना दहा हजाराची लाच घेताना बेळगाव लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई खानापूर तालुका ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. या कारवाईत बेळगाव लोकायुक्तचे अधीक्षक हणमंतराय, उपअधीक्षक भरत रे•ाr, निरीक्षक रविकुमार धर्मट्टी, निरीक्षक उस्मान अवटी याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. निलावडे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. काही कामांची पूर्तताही करण्यात आली आहे. या कामांच्या बिलांची तांत्रिक मंजुरी जिल्हा पंचायतीच्या अखत्यारित येते. खानापूर तालुका जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अभियंते दुरदुंडेश्वर बन्नूर यांची तांत्रिक मान्यता मिळणे गरजेचे असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बन्नूर यांनी ही बिले अडवून धरली होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी विनायक मुतगेकर यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. विनायक मुतगेकर हे आपण ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष असल्याने लाच देऊ शकत नाही, असे ठणकावून सांगितले होते. मात्र बन्नूर यांनी पैशासाठी बिलाची अडवणूक केल्याने शेवटी विनायक मुतगेकर यांनी बेळगाव लोकायुक्तांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. मंगळवारी सकाळी 11 वाजता सापळा रचून बन्नूर यांना दहा हजाराची लाच घेताना लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले. यानंतर दिवसभर चौकशी करून रितसर कारवाई केली असून लोकायुक्तांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
Home महत्वाची बातमी जि. पं. चा विभागीय अभियंता लोकायुक्तांच्या जाळ्यात
जि. पं. चा विभागीय अभियंता लोकायुक्तांच्या जाळ्यात
दहा हजाराची लाच घेताना खानापुरात लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले : पैशासाठी बिलाची अडवणूक खानापूर : बेळगाव जिल्हा पंचायतीचे खानापूर तालुका विभागीय कार्यालयाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता दुरदुंडेश्वर महादेव बन्नूर यांना दहा हजाराची लाच घेताना बेळगाव लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई खानापूर तालुका ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर […]