जि. पं. सह दहा पंचायतींची 23 रोजी पोटनिवडणूक
पणजी : दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघ तसेच विविध ग्राम पंचायतींच्या 10 प्रभागांसाठी येत्या दि. 23 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतमोजणी दि. 24 रोजी होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या 10 प्रभागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यात कुंडई (प्रभाग 7), वळवई (प्रभाग 2), केरी (प्रभाग 4), बोरी (प्रभाग 11), राशोल (प्रभाग 5), सेरावली (प्रभाग 2), असोळणा (प्रभाग 1), कुडणे डिचोली (प्रभाग 2), शेल्डे केपे (प्रभाग 2), सुकूर (प्रभाग 10) यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी दि. 5 ते 12 जून दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. 13 रोजी अर्जांची छाननी व दि. 14 रोजी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असेल. दि. 23 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 पर्यंत मतदान होईल व दि. 24 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
Home महत्वाची बातमी जि. पं. सह दहा पंचायतींची 23 रोजी पोटनिवडणूक
जि. पं. सह दहा पंचायतींची 23 रोजी पोटनिवडणूक
पणजी : दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघ तसेच विविध ग्राम पंचायतींच्या 10 प्रभागांसाठी येत्या दि. 23 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतमोजणी दि. 24 रोजी होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या 10 प्रभागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यात कुंडई (प्रभाग 7), वळवई (प्रभाग 2), केरी (प्रभाग 4), बोरी (प्रभाग 11), राशोल […]