जप्त केलेल्या 3 क्विंटल गांजाची विल्हेवाट
कारखान्याच्या चिमणीत जाळून केला नष्ट : जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या उपस्थितीत कारवाई
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात जप्त करण्यात आलेला तीन क्विंटलहून अधिक गांजासाठा शुक्रवारी नष्ट करण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद व पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या 53 प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेला 291 किलो 336 ग्रॅम गांजा न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुमतीने जिल्हा ड्रग्ज डिस्पोझल कमिटीच्या उपस्थितीत रितसर नष्ट करण्यात आला. सौंदत्ती तालुक्यातील हारुगोप्पजवळील दि बेलगाम ग्रीन एन्व्हिरॉनमेंटल मॅनेजमेंट प्रा. लि. च्या चिमणीत गांजासाठा जाळून नष्ट करण्यात आला. त्याची किंमत 15 लाख 10 हजार 821 रुपयांहून अधिक होते. वेगवेगळ्या पोलीस स्थानकात कारवाईदरम्यान जप्त केलेला गांजा अशाप्रकारे नष्ट केला जातो. बेळगाव शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात 22 गुन्ह्यांमध्ये 9 किलो 624 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. त्याची किंमत 5 लाख 8 हजार 455 रुपये इतकी होते. हा साठा शुक्रवारी हारुगोप्प येथे नष्ट करण्यात आला.
Home महत्वाची बातमी जप्त केलेल्या 3 क्विंटल गांजाची विल्हेवाट
जप्त केलेल्या 3 क्विंटल गांजाची विल्हेवाट
कारखान्याच्या चिमणीत जाळून केला नष्ट : जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या उपस्थितीत कारवाई बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात जप्त करण्यात आलेला तीन क्विंटलहून अधिक गांजासाठा शुक्रवारी नष्ट करण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद व पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात […]