विद्यार्थी संघटनेच्या अनुपस्थितीवर चर्चा
उत्तर प्रदेशात प्रयागराज (अलाहाबाद) आणि नजीकच्या भागांमध्ये प्रयागराज विद्यापीठ विद्यार्थी संघटनेसंबंधाने सध्या जोरदार चर्चा होत आहे. ही संघटना या भागातील प्रत्येक निवडणुकीत मोठ्या हिरीरीने सहभाग घेत असे. मात्र, अलिकडच्या काळात या संघटनेचे महत्व कमी होताना दिसत आहे. ही संघटना आता फारशा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली नाही. हाच चर्चेचा विषय आहे.
ही स्थिती 2018 पासून उद्भवली आहे, असे बोलले जाते. त्यावर्षी ही संघटना बंद करण्यात आली होती. विद्यापीठ परिसरात घडलेली काही हिंसाचाराची प्रकरणे आणि अन्य काही घटना यांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. ही संघटना अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटना या नावाने प्रसिद्ध होती. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात या संघटनेने भाग घेतला होता. या विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाचा धसका ब्रिटीश प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे ती संघटना रद्द करण्यात आली होती. नंतर 1945 मध्ये ती पुन्हा सुरु करण्यात आली.
पुस्तकात उल्लेख
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध लेखक श्याम कृष्ण पांडे यांनी आपल्या एका पुस्तकात या संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विधिज्ञ के. के. रॉय हे या संघटनेचे 1988 पासून 1991 पर्यंत अध्यक्ष होते. त्यांनीही या संघटनेच्या कार्याचा गौरव केला आहे. विद्यार्थी दशेतील राजकारण हा लोकशाहीचा पाया असतो. राजकीय शिक्षणाची ती प्राथमिक शाळा असते. या शाळेतूनच पुढे मोठे राजकारणी, विचारवंत, लोकसेवक, पत्रकार आणि अनेक क्षेत्रांमधील मान्यवर निर्माण होत असतात, असे मत रॉय यांनी यासंबंधात व्यक्त केले आहे.
Home महत्वाची बातमी विद्यार्थी संघटनेच्या अनुपस्थितीवर चर्चा
विद्यार्थी संघटनेच्या अनुपस्थितीवर चर्चा
उत्तर प्रदेशात प्रयागराज (अलाहाबाद) आणि नजीकच्या भागांमध्ये प्रयागराज विद्यापीठ विद्यार्थी संघटनेसंबंधाने सध्या जोरदार चर्चा होत आहे. ही संघटना या भागातील प्रत्येक निवडणुकीत मोठ्या हिरीरीने सहभाग घेत असे. मात्र, अलिकडच्या काळात या संघटनेचे महत्व कमी होताना दिसत आहे. ही संघटना आता फारशा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली नाही. हाच चर्चेचा विषय आहे. ही स्थिती 2018 पासून उद्भवली आहे, […]