चर्चा एकच…घोरपड दिसली ..!

चन्नम्मानगर येथील घटना बेळगाव : वन्यजीवांचा वावर आता शहर आणि उपनगरांमध्येही वाढू लागला आहे. बुधवारी चन्नम्मानगर, दुसरा स्टेज येथे एका विद्युत खांबावर घोरपड आढळून आली. घोरपड दिसल्याने या परिसरात एकच चर्चा सुरू होती. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. परंतु त्यापूर्वीच घोरपड तेथून निघून गेली होती. विद्युत खांबावर चढलेली घोरपड पाहताच एका विद्यार्थिनीने तिचे छायाचित्र व […]

चर्चा एकच…घोरपड दिसली ..!

चन्नम्मानगर येथील घटना
बेळगाव : वन्यजीवांचा वावर आता शहर आणि उपनगरांमध्येही वाढू लागला आहे. बुधवारी चन्नम्मानगर, दुसरा स्टेज येथे एका विद्युत खांबावर घोरपड आढळून आली. घोरपड दिसल्याने या परिसरात एकच चर्चा सुरू होती. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. परंतु त्यापूर्वीच घोरपड तेथून निघून गेली होती. विद्युत खांबावर चढलेली घोरपड पाहताच एका विद्यार्थिनीने तिचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रीकरण केले. सामाजिक कार्यकर्ते नरू निलजकर व अवधूत तुडवेकर यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून घोरपड शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पोहोचण्यापूर्वीच बाजुच्या खुल्या जागेत घोरपड निघून गेली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. वन विभागालाही याची माहिती देण्यात आली.