140 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचा शोध

समुद्रात बुडालेल्या जहाजाचा शोध नेहमीच मोठी घटना मानली जाते. जुन्या काळात वादळांमुळे अनेक जहाजं बुडायची. अशा स्थितीत जहाजावरील खजिन्याचा शोध घेतला जायचा. आता एक अत्यंत मोठे जहाज अलिकडेच 140 वर्षांनी शोधले गेले आहे. पाणबुड्यांनी या जहाजाच्या अवशेषातून मिळालेल्या एका तुटलेल्या प्लेटची ओळख पटविली आहे. ब्रिटनचे एसएस नांत्स नावाचे हे प्रसिद्ध जहाज 1888 मध्ये एका जर्मन […]

140 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचा शोध

समुद्रात बुडालेल्या जहाजाचा शोध नेहमीच मोठी घटना मानली जाते. जुन्या काळात वादळांमुळे अनेक जहाजं बुडायची. अशा स्थितीत जहाजावरील खजिन्याचा शोध घेतला जायचा. आता एक अत्यंत मोठे जहाज अलिकडेच 140 वर्षांनी शोधले गेले आहे. पाणबुड्यांनी या जहाजाच्या अवशेषातून मिळालेल्या एका तुटलेल्या प्लेटची ओळख पटविली आहे. ब्रिटनचे एसएस नांत्स नावाचे हे प्रसिद्ध जहाज 1888 मध्ये एका जर्मन जहाजाला धडकून बुडाले होते.
एसएस नांत्स हे ब्रिटनचे प्रसिद्ध सागरी जहाज होते. 1888 मध्ये हे लिव्हरपूल  येथून ले हावरेच्या दिशेने प्रवास करत होते. जहाजात कोळसा लादलेला होता, जर्मन जहाज थिओडोर रुगरने या जहाजाला धडक दिली होती. या धडकेमुळे जहाजाची लाइफबोट तुटली, चालक दलाला बाहेर पडता आले नाही, अनेक तासांपर्यंत जहाज तरंगत राहिले, मग  अत्यंत वेगाने बुडाले कारण धडकेमुळे जहाजाला मोठे छिद्र पडले होते. या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला होता तर केवळ 3 जण वाचू शकले होते.
अवशेषही शोधता आले नव्हते
एसएस नांत्स हे 1874 साली निर्माण करण्यात आले होते. कुनार्ड स्टीमशिप कंपनीचे हे मालवाहू जहाज होते. बुडाल्यावर हे जहाज गायब झाले होते. त्या काळात नेव्हिगेशन सिस्टीम नव्हती. जहाजाचे अवशेष शोधणे अवघड होते. दुर्घटनेनंतर जहाजाचे तुकडे अन् मृतदह कॉर्नवाल किनाऱ्यावर पोहोचले होते.
कशी पटली ओळख?
2024 मध्ये पाणबुडे डॉमिनिक रॉबिन्सन यांनी या जहाजाचा शोध लावला. माजी सैन्याधिकारी डॉमिनक हे 35 वर्षांपासून पाणबुडे म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एक तुटलेली प्लेट पाहिली, प्लेटवर कुनार्ड स्टीमशिपचा लोगो होता. यामुळै जहाजाची ओळख पटू शकली. पूर्वीही लोक या अवशेषांच्या शोधाकरता समुद्रात उतरले होते. परंतु कुणालाच यात यश मिळाले नव्हते. या छोट्या प्लेटने रहस्य सोडविले आहे. जहाजाची रचना, तंत्रज्ञान आणि आकाराने देखील ओळख पटविण्यास मदत केल्याचे डॉमिनिक यांनी सांगितले.
सागरी पुरातत्वप्रकरणी मोठे यश
संबंधित जहाज 240 फूट लांब होते. सागरी इतिहास तज्ञ डॉ. हॅरी बेनेट यांनी या शोधाचे कौतुक केले. स्थानिक पाणबुड्यांनी चांगले काम केले आहे. ही सागरी दुर्घटना मोठे रहस्य ठरले होते. ढिगाऱ्यांचे मिळालेले व्हिडिओ अन् पुराव्यांची तपासणी झाली. हे एसएस नांत्स जहाजच असल्याचे डॉ. बेनेट यांनी सांगितले आहे. आता या शोधाने इतिहासाला जिवंत केले आहे. एसएस नांत्सचा शोध मोठी कामगिरी आहे. लोक आता एसएस नांत्सची कहाणी व्हिडिओद्वारे जाणून घेत आहेत. हा शोध सागरी पुरातत्वाचा मोठा विजय आहे. रहस्याची उकल करून मी अत्यंत आनंदी आहे, यामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आठवणीत ठेवले जाईल असे डॉमिनिक यांनी म्हटले आहे.