दोडामार्गात ढिसाळ नियोजनाचा दिव्यांग बांधवांना फटका

ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग पडताळणी शिबिराचे आयोजन ; अखेर नियोजन सुधारीत करून शिबिर सुरळीत दोडामार्ग – वार्ताहर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी आयोजित केलेल्या दिव्यांग लाभार्थी पडताळणीस आलेल्या उपस्थित दिव्यांग बांधवांना ढिसाळ नियोजनाचा सुरुवातीला फटका बसला. मात्र बऱ्याच वेळानंतर शिबिर सुरळीत करण्यात आले. त्यानंतर अनेक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला. तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी शुक्रवारी दिनांक […]

दोडामार्गात ढिसाळ नियोजनाचा दिव्यांग बांधवांना फटका

ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग पडताळणी शिबिराचे आयोजन ; अखेर नियोजन सुधारीत करून शिबिर सुरळीत
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी आयोजित केलेल्या दिव्यांग लाभार्थी पडताळणीस आलेल्या उपस्थित दिव्यांग बांधवांना ढिसाळ नियोजनाचा सुरुवातीला फटका बसला. मात्र बऱ्याच वेळानंतर शिबिर सुरळीत करण्यात आले. त्यानंतर अनेक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला. तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी शुक्रवारी दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी दिव्यांग लाभार्थी यांना पडताळणी शिबिर आयोजित केले होते .याबाबत रीतसर जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी पंचायत समिती दोडामार्ग यांना पाठविले होते. यानुसार पं.स .प्रत्येक ग्रामपंचायतला पत्र पाठवून दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी 11 ते 6 या वेळेत ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित रहावे असे पत्रात नमूद केले होते. त्यानुसार सकाळपासूनच दिव्यांग बांधवाने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपस्थिती लावली. नियोजित वेळेत ओरस येथून जिल्हा रुग्णालयाची टीम दाखल झाली पण ग्रामीण रुग्णालयाने सुरुवातील नियोजनच केले नसल्यामुळे याचा फटका उपस्थित राहिलेल्या दिव्यांग बांधवांना बसला. तालुक्यातून बहुसंख्येने दिव्यांग बांधव येणार असे असताना सुद्धा त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली नाही. समोरच्या पटांगणात मंडप देखील उभारण्यात आला नाही. कडक उन्हात सर्व बांधवांना उभे राहावे लागले. त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांचा पारा चढला होता. बसण्याचे व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही कोणीही व्यवस्थित माहिती देत नाही कशाला अशी शिबिरे आयोजित करतात नियोजन करता येत नसेल अशी शिबिरे आयोजित करू नको अशी संतप्त प्रतिक्रिया दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली. मात्र त्यानंतर रुग्णालयाने व्यवस्थित नियोजन करून शिबिर यशस्वीरित्या पार संपन्न केले. यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, संदेश वरक, घोडगेवाडी माजी सरपंच घनश्याम कर्पे उपस्थित होते. तर उपस्थित दिव्यांगांसाठी घनश्याम कर्पे व संदेश वरक यांनी पाण्याची व्यवस्था केली.