सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर “विशेष निमंत्रित” सदस्यपदी दिलीप गिरप

वेंगुर्ले (वार्ताहर)- सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर “विशेष निमंत्रित” सदस्यपदी वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नि. भा. खेडकर यांनी त्यांना याबाबतच नियुक्तीपत्र दिलं आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीत सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ५ व्यक्तींना “विशेष निमंत्रित” म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या […]

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर “विशेष निमंत्रित” सदस्यपदी दिलीप गिरप

वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर “विशेष निमंत्रित” सदस्यपदी वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नि. भा. खेडकर यांनी त्यांना याबाबतच नियुक्तीपत्र दिलं आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीत सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ५ व्यक्तींना “विशेष निमंत्रित” म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येते. यात वेंगुर्ले चे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीनंतर वेंगुर्ले येथील दिलीप गिरप यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.