दैनिक तरूण भारतच्या 31 व्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रिघ

दैनिक तरूण भारतच्या कोल्हापूर आवृत्तीच्य़ा 31व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हातील राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन दैनिक तरूण भारत संवाद परिवारास शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते आज वर्धापनदिनाच्य़ा अंकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्या या तीन राज्यासह आपल्या सोशल मीडीयाच्या माध्यमांतून जगभरातील वाचकांना ‘तरूण […]

दैनिक तरूण भारतच्या 31 व्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रिघ

दैनिक तरूण भारतच्या कोल्हापूर आवृत्तीच्य़ा 31व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हातील राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन दैनिक तरूण भारत संवाद परिवारास शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते आज वर्धापनदिनाच्य़ा अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्या या तीन राज्यासह आपल्या सोशल मीडीयाच्या माध्यमांतून जगभरातील वाचकांना ‘तरूण भारत संवाद’ हे निर्भिडपणे आशय पुरवते. राजकिय आणि सामाजिक प्रश्नावर आपले सडेतोड आणि निर्भिड मत व्यक्त करून समाजमनाचा आरसा दाखवण्याचा नेहमीच तत्पर आहे. ‘तरूण भारत संवाद’च्या कोल्हापूर आवृत्तीचा आज 31वा वर्धापन दिन संपन्न होत आहे. दसऱा चौकातील शाहू स्मारक सांस्कृतिक भवनामध्ये दैनिक तरूण भारत संवाद परिवाराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
आज सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी भेट देऊन आवृत्तीचे संपादक मनोज साळुंके यांना शुभेच्छा दिल्या. महाराजांच्या हस्ते वर्धापन दिनाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.  त्याच बरोबर डी. वाय. पाटील ग्रुपचे संजय पाटील, शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे, यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, कुलसचिवर व्ही. एन. शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.