पश्चिम बंगाल मधील एक सुंदर आणि स्वस्त ठिकाण दिघा,जोडप्यांसाठी उत्तम आहे

पश्चिम बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले, दिघा हे एक रोमँटिक ठिकाण आहे, जे सौंदर्य आणि समुद्र किनाऱ्याच्या बाबतीत गोवा किंवा मुंबईपेक्षा कमी नाही. कोणत्याही जोडप्यासाठी पश्चिम बंगाल मधील हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही.जर आपण देखील आपल्या …

पश्चिम बंगाल मधील एक सुंदर आणि स्वस्त ठिकाण दिघा,जोडप्यांसाठी उत्तम आहे

पश्चिम बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले, दिघा हे एक रोमँटिक ठिकाण आहे, जे सौंदर्य आणि समुद्र किनाऱ्याच्या बाबतीत गोवा किंवा मुंबईपेक्षा कमी नाही. कोणत्याही जोडप्यासाठी पश्चिम बंगाल मधील हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही.जर आपण देखील आपल्या जोडीदारासह कोठे प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आपण या ठिकाणी आवर्जून जाऊ शकता.चला तर मग दिघा मधील काही उत्तम ठिकाणांबद्दल जाणून घ्या.

 

1) नवीन दिघा बीच-दिघा मधील एक उत्तम समुद्रकिनारा म्हणजे नवीन दिघा बीच. ही खूप शांत जागा आहे थंड समुद्रातील वारा,ताडाची उंच झाडे आणि शांततेसाठी या समुद्रकिनाऱ्याला भेट देता येते.आपण येथे उपस्थित असलेल्या जवळच्या हॉटेल्समधून देखील या सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकता. 

 

2) शंकरपूर बीच-शंकरपूर समुद्रकिनारा दिघा पासून काही किलोमीटर अंतरावर आहे. येथील सूर्यास्त आणि सूर्योदय बघता समुद्राच्या लाटांचाही आनंद घेता येतो. येथे आपण मासेमारीच्या जाळ्या आणि बोटीसह स्थानिक मच्छीमार देखील बघू शकता. या समुद्राच्या बाजूला काही मंदिरेही आहेत.

 

3) तलसरी किनारा-जर आपण शांततेत थोडा वेळ घालवू इच्छित असाल तर आपण या बीचवर जाऊ शकता.येथून दूरवरच्या डोंगरांची भव्य दृश्ये पाहून आपले मन नक्कीच प्रसन्न होईल.जर खवय्ये असाल तर नक्कीच या बीचला भेट द्या कारण  येथे आपण चविष्ट सीफूड चा आस्वाद घेऊ शकता.

 

4) अमरावती पार्क -दिघा मध्ये फिरण्यासाठी हे सर्वोत्तम उद्यान आहे. या उद्यानात एक तलाव देखील आहे, जेथे आपण नौकाविहाराचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेले हे उद्यान हंगामी फळांसाठी प्रसिद्ध आहे.